गेवराई (प्रतिनिधी) पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरु असतांना या कालव्याला जोडलेल्या चारीद्वारे पिकांसाठी पाणी पुरवठा केला जात होता.
चारी द्वारे पाणी पुरवठा करत असतांना या चारीत गाळ साचून काटेरी झुडपे उगल्याने तुटफुट झाली होती. चारीद्वारे सुरळीत पाणी पुरवठा होत नव्हता यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचत असल्याने हजारो क्युसेक पाण्याची नासाडी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे.
मौजे कोल्हेर येथील चारी नं. ३१ फुटलेली चारी दुरुस्त करून घ्यावी आणी चारीच्या पाण्यामुळे शेत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तो रस्ता दुरुस्त करून द्यावा नसता पंधरा दिवसांनी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. २ बागपिंपळगाव कार्यालया समोर लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करु असा ईशारा पप्पु गायकवाड, वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष यांनी पाटबंधारे विभागाला दि.२१ मार्च रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या ईशाऱ्यामुळे पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आणि चारीतील झूडपे व गाळ काढून चारी रुंद व खोल करण्यास सुरुवात केली. चारी दुरुस्त करत आहेत हे पाटबंधारे विभागाचे कामच आहे परंतु या चारीचे पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्या नुकसानीची भरपाई द्यावी नसता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असे पप्पु गायकवाड वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
No comments:
Post a Comment