परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नात्रा येथील बुद्ध विहार बांधून देण्यासह विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी तालुक्यातील नाथरा या गावातील बौद्ध विहार हे 1991 ते 92 रोजी बांधण्यात आले असून ते आज मोडकळीस आले असून ते लवकरात लवकर बांधून देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा तसेच येथील रोड आल्या लाईट इत्यादी दुरुस्त करण्यात याव्या याचे निवेदन ते वीस दोन दोन हजार बावीस रोजी परळी पंचायत समिती कार्यालयात दिली असून त्याची आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे परत आज दिनांक 09/02/2022 परत निवेदन दिले असता सदरील बुद्ध विहार व विविध कामे लवकरात करण्यात यावे अन्यथा लवकरच उपोषणास बसण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून या निवेदनावर मुंजा मस्के सिद्धार्थ आदमाने सुयोग गिरवले सिद्धार्थ पैठणे महेश शिंदे विशाल थोरात गजानन मिसाळ विनय उपाडे अशोक वाघमारे यांच्यासह अनेकाचया सह्या असून हे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर जिल्हा उपाध्यक्ष प्रसेंजित रोडे जिल्हा युवक आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब किरवले युवक नेते राजेश सरोदे गौतम आदमाने धम्मानंद पैठणे. इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment