Tuesday, February 22, 2022

गलथान कारभारामुळे बार्टीच्या विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरूच

बीड : गेल्या काही दिवसांपासून बार्टीच्या विद्यार्थ्यांचे फेलोशिप प्रकरणावरून महाराष्ट्रभर आमरण उपोषण चालू असून परळी वैजनाथ येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बार्टी संशोधक विद्यार्थ्यांनी उपोषण केले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन या प्रकरणी विद्यार्थ्यांना चौकशी करून न्याय देवू, असे आश्वासन दिले होते.

सारथी मार्फत ५३६ तर महाज्योतिमार्फत ५९४ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आली. मात्र बार्टीकडून फक्त ४०० संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आली. युजीसीच्या नियमानुसार एमफिल ते पीएचडी असे सलग आणि सरसकट पाच वर्ष फेलोशिप देण्याची मागणी योग्य असून ती तात्काळ पूर्ण करावी. त्याचबरोबर फेलोशिप करीत अभियांत्रीकी, वैद्यकिय आणि इतर अभ्यासक्रमही यात सामाविष्ट करावेत, असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप न्याय मिळाला नसून महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या गलथान कारभारामुळे बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचे न्यायासाठी आमरण उपोषण चालू असल्याचा आरोप महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केला, तर धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे  रिपब्लीकन स्टुडंट्स युनियन संघटनेचे प्रमुख आमोल वेटम यांनी ट्वीट केले आहे.


No comments:

Post a Comment