परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहर पोलिसांनी कारवाई करत तीन गावठी पिस्टल आणि सात राऊंड पकडली आहेत. परळी डि.बी.पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये आणि पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई केली. यात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून बेकायदा शास्त्र बाळगण्याच्या कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईनंतर पोलीस उपअधीक्षक सुनील
जायभाये यांनी शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन कारवाईत सहभागी पोलिसांचे अभिनंदन करून कौतुक केले. दोन इसम गावठी पिस्टल घेऊन ते विकण्यासाठी परळीत येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही परळी शहर ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सहकाऱ्यांना आरोपींच्या शोधात पाठवले. चांदापूर रस्त्यावर असलेल्या हनुमान चौकात दोघेजण आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे शस्त्रे आढळून आली. मनोज भरत गित्ते, रा.हाळम आणि नागनाथ देवनाथ फड, रा.उखळी खुर्द, ता.गंगाखेड अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचबरोबर पकडण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही माहिती मिळते का? याचा पोलीस शोध घेत आहेत. पकडण्यात आलेल्या शास्त्रांचे पत्रकार परिषद घेऊन विवरण देण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ आदी उपस्थित होते. डि. बी.पथक प्रमुख भास्कर केंद्रे, तुकाराम मुरकुटे, गोविंद भाताने, श्रीकांत राठोड, गोटू गोरे, राजकुमार मुंडे आदी उपस्थित होते. मागील वर्षभरात परळी शहर पोलिसांकडून जवळपास आठ पिस्टल पकडण्यात पोलिसांना यश आले आहे

No comments:
Post a Comment