Tuesday, February 22, 2022

ओबीसींनी काँग्रेसचे हात बळकट करावेत ;- प्रा. सुधीर पोतदार


बीड  (प्रतिनिधी) मराठवाडा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक सुधीर पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. या प्रसंगी बोलताना जिल्ह्यातील ओबीसींनी आपली शक्ति काँग्रेसच्या पाठीमागे लावावी.कारण कांग्रेस च ओबीसींचे घटनात्मक अधिकार कायम ठेवु शकते,अशी प्रतिपादन प्राध्यापक सुधीर पोतदार यांनी केले.

बीड जिल्हा शासकीय निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी बोलताना सुधीर पोद्दार म्हणाले की देशातील ओबीसींनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले परंतु नरेंद्र मोदींनी ओबीसीचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत,ओबीसींच्या राजकीय आरक्षण संपवलं, शिष्यवृत्ती बंद केली.म्हणून बीड जिल्ह्यातील व देशातील ओबीसींनी काँग्रेसचा हात बळकट करून राज्यघटनेने जे  अधिकार दिले आहेत ते अधिकार बळकट करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याच बरोबर ओबीसी पदाधिकाऱ्यांनी येत्या काळातील नगर परिषदा व जिल्हा परिषदेच्या  सर्व निवडणुका पुर्ण तिकदीने लढवाव्यात तरच जिल्ह्यातील कांग्रेस चे संघटन जिल्यात बळकट होईल.असे आव्हान प्रा.सुधीर पोद्दार यांनी केले.

या प्रसंगी ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष वचिष्ट बडे, प्रदेश उपाध्यक्ष परवेज कुरेशी, , शहराध्यक्ष इद्रीश हाश्मी, प्रदेश संघटक अशोक बहीरवाळ व जालींदर करडकर,अॅड राहुल साळवे,अरूण अबा कांबळे,सेवादल अध्यक्ष योगेश शिंदे, सुनील नागरगोजे, असंघटित अध्यक्ष संतोष निकाळजे,गोंविंद साठे,युवक अध्यक्ष रुषभ कोठारी,रमेश सानप,संभाजी जाधव, जयप्रकाश अघाव,एससीयुआय कार्याध्यक्ष जयदीप राउत,संदीप केदार,जावेद शेख, महादेव देवकर,बाळासाहेब बडे , शहराध्यक्ष अमजद कुरेशी इ.उपस्थित होते.

No comments:

Post a Comment