Wednesday, February 23, 2022

महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या वर्धापनदिनानिमित्त २४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन.


मुंबई  : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेस 47 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने  वर्धापनदिनाचा कार्यक्रम वालचंद हिराचंद हॉल, 4 था मजला, इंडियन मर्चंट सेंटर, चर्चगेट रेल्‍वेस्‍टेशन समोर, चर्चगेट, मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे.

या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, महिला व बाल विकास राज्‍यमंत्री बच्‍चू कडू, उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, राज्‍य महिला आयोग अध्‍यक्ष रूपाली चाकणकर, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव आय.ए. कुंदन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

No comments:

Post a Comment