Friday, February 18, 2022

वैद्यकिय पात्रता नसणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करणार - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा




बीड : जिल्ह्यातील वैद्यकिय पात्रता नसलेले काही डॉक्टर नागरिकांच्या जिवाशी खेळत असून वैद्यकिय क्षेत्रातील कोणतीही पात्रता शिक्षण डिग्री नसताना जिल्ह्यात सर्रासपणे दवाखाने उघडून जनतेला लुटण्याचे  काम करत आहेत. अशा डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभाग्रहात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक झाली.

या बैठकीत बोलताना त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकिय पात्रता नसताना नागरिकांवर वेगवेगळ्या पध्दतीने उपचार करून नागरिकांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कायद्यानुसार कडक कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी तालुका स्तरावरील पथकांनी कारवाई करून प्रत्येक महिन्याला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा. तसेच नगर परिषद स्तरावर वैद्यकिय अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकांनी कार्यवाही करावी. वैद्यकिय पात्रता आणि परवाना नसलेल्या बोगस डॉक्टरवर निर्बंध घालावेत. पोलीस खात्याने अशा डॉक्टरांवर विविध कलमांचा वापर करत असताना जास्तीत जास्त शिक्षा होईल, असे कलम या बोगस डॉक्टरांवर लावून या प्रकरणी न्यायालयीन कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले. या बैठकिस पोलीस उपधिक्षक श्रीपाद परोपकारी, आरोग्य विभागाचे  डॉ. पी. के. पींगळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. बी. आर. ढाकणे, सदस्य शेख सिराज शेख, आय. ए. एम. बीड अध्यक्ष अनुराग पांगरीकर, बीड ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आर.टी. गर्जे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment