केज– केज शहरातील एका भागात 45 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे . केज शहरात दि . 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान होळ येथील एकाने फिर्यादीचे गेट वरुन उडी मारुन घरात प्रवेश केला व फिर्यादीस लज्जास्पद बोलून चापट मारून, वाईट हेतुने आंगाला झोंबाझोंबी केली . तसेच शिवीगाळ केली व जिवेमारण्याचीही धमकी दिली अशी फिर्याद पीडित महिलेने केली आहे . दरम्यान , सदर महिलेच्या तक्रारीवरून होळ ता . केज येथील एकजणाविरुद्ध केज पोलीसांत गुन्हा नोंद झाला आहे. सपोनी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना रुक्मिण पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत .
No comments:
Post a Comment