परळी वैजनाथ : परळी शहरातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे असलेले कार्डधारकांपैकी अनेक वर्षापासून राशन घेत नसलेल्या कार्डधारक किंवा व अपात्र ठरत असलेले कार्ड धारकांचे नावे डाटा अटीतून वगळावी. गरजू लोकांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध आहेत परंतु, धान्य साठा उपलब्ध नसल्याकारणाने त्यांचे नावे एन.पी.एच मध्ये आहेत. त्यांना त्यांचे प्रवर्ग प्रमाणे पीएचएच, ए.ए.पी./ए.पी.एल मध्ये त्यांची डाटा एंट्री करावी व त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे रेशन पुरवठा तात्काळ करावा अन्यथा परळी शहर काँग्रेसच्या वतीने 25 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर यांनी दिला आहे. परळी शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले.
परळी शहरातील रेशन पुरवठा सुरळीत होतो किंवा नाही. तसेच, रेशन कार्डधारकांना रेशन मिळते किंवा नाही याची याची काँग्रेस पक्षामार्फत माहिती घेण्यात आली. या माहितीमध्ये असे निदर्शनास आले आहे की, परळी शहरातील नागरिकांना राजकीय कार्यकर्त्यांनी मूर्ख बनवले. त्यांना त्यांचे वाढदिवस किंवा इतर प्रसंगी नागरिकांना रेशन कार्ड दिले. परंतु, कोठेही त्याची नोंद केलेली नाही किंवा त्याच्या डाटा एन्ट्री केलेल्या नाहीत व काही लोकांकडे जुनी राशन कार्ड उपलब्ध आहे. त्यांना पूर्वी रेशन मिळत होते. परंतु, त्यांचे डाटा एन्ट्री झाली नसल्यामुळे आता त्यांना रेशन मिळत नाही. अशा विविध तक्रारी आमच्या निदर्शनास आल्यामुळे परळीतल्या सर्व पात्र कार्डधारक व शासनाच्या योजनेपासून वंचित राहिलेले लोकांना रेशन मिळावे या हेतूने आमचा पक्ष आपल्याकडे मागणी करीत आहे. तरी रेशन पुरवठा मधील व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कारवाई करावी, असे बहादूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे. लोकांना त्यांचे हक्काचे रेशन उपलब्ध करून द्यावे अन्यथा परळी शहर काँग्रेसच्या वतीने 25 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर यांनी दिला आहे.
या निवेदनावर गणपत आप्पा कोरे, शिवाजी देशमुख, डॉ.शशीशेखर चौधरी,अशोक कांबळे, शेख सिकंदर, सी.एम.अजय पिंपळे, सिद्दीकी इतेशाम,धर्मराज खोसे पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment