Thursday, February 3, 2022

बनावट नोटा चालवणारी टोळी पोलीसांनी पकडली २४ लाखच्या बनावट नोटा जप्त तीन आरोपी अटक एक फरार.


तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण फाटा येथे लोकाना बनावट नोटा देवून त्या बदल्यात सुटे म्हणून खर्या नोटा घेणा-या भामाट्यांच्या टोळीतील तिघाना तेल्हारा पोलीसानी शिताफीने अटक केली असुन त्यातील एक जण फरार झाला आहे. या टोळीकडून पोलिसानी २४ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

तेल्हारा पोलीस नियमीत गस्तीवर असताना त्याना खबर मिळाली कि, पंचगव्हाण फाटा येथे चार ईसम बनावट नोटा देवून त्या बदल्यात सुटे म्हणून ख-या नोटा घेवून लोकाना फसवित आहेत. ही खबर लागताच गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल सोळंके, नापोकॉ सरदारसिंग डाबेराव, पोकॉ अमोल नंदाने, योगेश ऊमक, संदिप तांदूळकर, हरिशंकर शुक्ला हे पंचगव्हाण फाटा येथे पोचले. त्या ठिकाणी बनावट नोटा देणा-यावर या पथकाने छापा घातला. त्यात तिघाना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी झालेत तर फरार होण्यात एक गुन्हेगार यशस्वी झाला.

Adफरार झालेल्याचे नाव विजय ठाकुर असुन तो खामगाव जि. बुलडाणा येथे राहतो. अटक केलेल्यांची नावे अमित आत्माराम कटारे वय २७ रा, चिस्ताळा ता. मानोरा जि.वाशिम, अमोल गोविंद कटारे वय २२ रा. चिस्ताळा ता. मानोरा जि. वाशिम आणि वैभव चंदु दयाळ वय २२ रा. हिवरदरी ता. महागाव जि यवतमाळ असे आहे. या तिघांकडून पोलीसानी २३ लाख ९६ हजाराच्या बनावट नोटा, ५४ हजाराच्या ख-या नोटा, स्कॅर्पियो गाडी क्र. एमएच४३ एएल ७७६ किमत दहा लाख, एक क्रेटा गाडी क्र. एमएच ०३ सिएस २७४३ किमत १२ लाख असा ऐवज जप्त केला.

अटकेतील तिघांवर भादवी कलम ४८९-ब, ४८९-ई, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरु असुन पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनात पोऊनि. गणेश कायंदे करीत आहेत.


No comments:

Post a Comment