मराठवाडयात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर आहे. त्यामुळे महावितरणला प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी वीज बिल वसूलीसाठी वीज कर्मचा—यांनी वीज ग्राहकांच्या घरोघरी जावून ग्राहक थकबाकीत तर नाही ना, हे पाहिले जात आहे. ग्राहक आपले वीज बिल भरले आहे का, वीज बिल भरले नसेल तर ग्राहकाकडून वीज बिलाची रक्कम घेवून मोबाईलमधून महावितरणच्या एम्प्लॉई एॅपच्या माध्यमातून तात्काळ भरून घेतले जात आहे. वीज कर्मचारी दररोज किमान वीस ग्राहकांकडून वीज बिल वसूल करत आहेत. जे ग्राहक थकबाकीत आहेत. त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यासह वारंवार सांगून, नोटीसा बजावूनही बिले न भरल्यास मिटर वायर जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांना वीज बिलाची पैसे न भरल्यास अंधारात रहावे लागत आहे. महावितरणच्या या '' हर घर दस्तक '' मोहीमेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
महावितरणची वीज बिल वसूली व ग्राहकसेवा संदर्भात महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले हे मराठवाडयातील अभियंत्यांची दर आठवडयाला व्हीडीओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठक घेवून आढावा घेत आहेत. तसेच वीज बिल वसूलीसाठी क्षेत्रिय ठिकाणी स्वता : हा रस्त्यावर उतरून वसूली करत आहेत. बैठकीत दरमहा थकबाकीसह चालू वीज बिल वसूलीचे उदिष्ट पूर्ण न करणा—या अभियंत्यांना कामात कसूर करणे, वीज बिल वसूलीत दिरंगाई करणे, वीज गळती कमी न करणे, खंडित वीज पुरवठा पूर्ववत न करणे, आपल्या अधिनिस्त कर्मचा—यांवर वचक नसल्याने थकबाकीत वाढ होणे, ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करणे, विघुत वाहिनी व रोहित्रांची देखभाल करणे इत्यादी कारणावरून व वीज बिल वसूलीच्या उदिष्टाची पुर्तता न केल्याने मराठवाडयातील तीन अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रिय अधिक्षक अभियंत्यांनी निलंबित केले आहे. यामध्ये जालना उपविभाग, जि. जालनाचे उपकार्यकारी अभियंता, तेलगांव उपविभाग, जि. बिडचे उपकार्यकारी अभियंता, पाथरी उपविभाग, जि. परभणीचे उप कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच तसेच तीन अधिक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. व तीन अधिक्षक अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.व कामचुकार लाईनमनवरही मोठया प्रमाणात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न केल्यास कर्मचा—यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिल थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

No comments:
Post a Comment