पनवेल (प्रतिनिधी) येथील खंडेश्वर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच एकूण सहा जणींची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या या छाप्याने खळबळ उडाली असून अटक केलेल्याची कसून चौकशी सुरु आहे.
संबंधित आरोपी परराज्यातील रहिवासी असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडेश्वर पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील खन्दा कॉलनी परिसरातील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू होता. याठिकाणी काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून सहा तरुणींची सुटका केली आहे.
"पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील खन्दा कॉलनी परिसरातील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू होता. याठिकाणी काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून सहा तरुणींची सुटका केली आहे".
No comments:
Post a Comment