Wednesday, February 23, 2022

डॉ योगेश क्षीरसागर यांनी संत गाडगे महाराजांना केले अभिवादन.



 बीड (प्रतिनिधी) शिवसेनेचे युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी आज बुधवारी शहरातील संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती'

आज बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पेठ बीड भागातील यशवंत उद्यान परिसरात असणाऱ्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.गाडगे महाराज यांच्या विचारांवर चालत जीवन जगणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. असे ते म्हणाले

यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.सतिश साळुंके, नगरसेवक शुभम धुत, अजिंक्य चांदणे, माजी नगरसेवक अमोल पौळ,  तुकारामजी जाधव,मोहन राऊत,शंकर व्यव्हारे,सतिष मुळे,विकास व्यव्हारे,विलास जाधव, यशवंत मचाले, चंद्रकांत वडमारे, प्रमोद शिंदे, अमर विद्यागर, किरण बेदरे, विलास बामणे, भूषण पवार यांच्यासह समाज बांधव तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment