Saturday, February 5, 2022

मा.आ.पृथ्वीराज साठे यांच्या गाडीचा अपघात. सुदैवाने कुठलीही गंभीर हानी नाही.



केज (प्रतिनिधी) केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नाही . माजी आमदार साठे हे केज बीड महामार्गावरुन जात असताना केज पासून जवळच असलेल्या टाकळी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे . या अपघातात त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आहे. यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . परंतु यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झालेले नाही . सदर घटना शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली आहे . दरम्यान अपघात झाला त्याचवेळी युवानेते अक्षय मुंदडा हे बीडकडून आले होते . सदर घटना त्यांनी पाहताच त्यांनी थांबून गाडीतील माजी आमदार साठे यांना व इतर दोघांना बाहेर काढून तात्काळ दवाखान्यात पाठवून दिल्याचे कळते.

No comments:

Post a Comment