परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील गायत्री फिटिंग नावाच्या स्वतःच्या दुकानांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी घडली आहे
बीड जिल्ह्यातील परळी शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात असलेल्या गायत्री फिटिंग नावाच्या स्वतःच्या दुकानातच प्रवीण प्रभाकर मालेवार या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सदर घटना आज शुक्रवारी घडली आहे आहे
मात्र आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी परळी शहर पोलिस दाखल झाले आणि सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
No comments:
Post a Comment