परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आय.पी.एस पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी येथे दुकानात गुटख्यावर छापा टाकला असून त्यांच्या पथकाने सुमारे चार लाख चाळीस हजाराचा गुटखा जप्त केला असून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत

परळी येथे किराणा दुकानात बेकायदेशीररित्या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला त्यानंतर. दुकानातून विविध प्रकारचा ४ लाख ४० हजारांचा गुटखा जप्त केला.  जयंत रघुनाथ लोकरे, आनंद मुंजाजी फल्ले  अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अल्ताफ पठाण, फिरोज शेख, गफार खान हे  तिघे फरार होण्यात यशस्वी ठरले याप्रकरणी बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे