पाली येथील स्मशानभूमीत आंदोलन करणाऱ्या महिलेला न्याय न होऊ शकलेल्या पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्या जिल्ह्य़ातच विधवा महिलेला पतीच्या आत्मदहनास कारणीभूत प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ज्या स्मशानभुमीत पतीचे अंत्यसंस्कार केले त्याच ठिकाणी ७ दिवसापासुन आमरण उपोषण सुरू असून आठवडा उलटला तरी अद्याप त्या महिलेला न्याय मिळवुन देण्यासाठी पुढाकार न घेतल्यामुळे जर बीड जिल्ह्य़ातील महिलांनाच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री धनंजय मुंढे न्याय देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
राज्य महिला आयोगाला तक्रार
तारामती अर्जुन साळुंके यांचे पती अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी स्वतःच्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी वारंवार निवेदन देऊन न्याय मागितल्यानंतर पाटबंधारे विभाग व जिल्हाप्रशासनातील आधिका-यांच्या मानसिक छळाला कंटाळुन दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी पाटबंधारे विभागाच्या आवारात आत्मदहन केले होते त्यातच त्यांचा मृत्यु झाला होता ,
वरील प्रकरणात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३९/२०२० कलम ३०६,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल असून संबधित प्रकरणात कारवाईस जाणीवपुर्वक विलंब करण्यात येत आहे.
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
वरील प्रकरणातील आरोपी उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर, कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, भुमिअभिलेख उपअधिक्षक कापसे हे संगनमतानेच तारामती अर्जुन साळुंके यांच्यावर तक्रार मागे घेण्यास दबाव आणत असुन संबधित प्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या ८ दिवसापासुन स्मशानभुमीत आमरण उपोषणास बसलेल्या असून संबधित प्रकरणात जिल्हाप्रशासनातील आधिकारी तसेच पालकमंत्री बोटचेपेपणाची भुमिका घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना तक्रार केली आहे.
No comments:
Post a Comment