Saturday, February 5, 2022

आठवी ते बारावी 7 तारखेपासून बीड जिल्ह्यातील शाळां सुरु होणार.


facebook sharing button
twitter sharing button

बीड  :- गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात बंद असलेल्या शाळांचे दरवाजे उघडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या कांही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता येत्या 7 तारखेपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.

तसेच 15 ते 18 वयोगटातील लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करून घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment