Saturday, January 22, 2022

वाळुतस्करीच्या गुंडागिरीतुन भर चौकात गोळीबार. शेवगाव तालुक्यात खळबळ.


शेवगाव(प्रतिनिधी ) वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता घडली. दोन दुचाकीवरून बाहेरुन आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.शेवगाव तालुक्याच्या हद्दीवरून गोदावरी नदी वाहते. 

या नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा चोरीछुपा सुरू असतो. या वाळूच्या तस्करीतून अनेकवेळा दोन गटात मारामार्‍या, जाळपोळ व खुनासारख्या घटना घडल्याने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याने अनुभवल्या आहेत.त्यातच आज शनिवारी सकाळी 10 वाजता चापडगाव येथे बाहेर गावाहुन दोन दुचाकीवर चौघे तरुण आले होते. भर चौकातच गावातील एका तरुणांवर यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. ही गोळी चापडगाव येथील तरुणाच्या हाताला चाटून गेली. तर त्या तरुणांनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने चापडगावसह शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा वाळू तस्करीने गुंडगिरी वाढल्याची बाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरु केला आहे

No comments:

Post a Comment