Monday, January 17, 2022

नर्सवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी.


औरंगाबाद (प्रतिनिधी)  दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात या डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. डॉ देशमुख असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात एका खासगी दवाखान्यात हे दोघे काम करत असतांना निर्माण झालेल्या ओळखीतून डॉ. देशमुख यांनी नर्ससोबत अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासोबतच या डॉक्टरच्या मावस भावाने देखील पिडीतेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला याप्रक्रारणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु असल्याचे कळते.

No comments:

Post a Comment