Thursday, January 20, 2022

विरशैव लिंगायत समाजाचे श्री गुरु नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे तमाम मानवजातीला लसीकरणासाठी आवाहन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सोनपेठ शहरातील श्री नंदीकेश्वर मठ संस्थान चे अध्यक्ष तथा विरशैव लिंगायत समाज बांधवांचे गुरुवर्य श्री गुरु नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी तमाम मानव जातीला कोरोना महामारीत बचावाचा एकमेव उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे,ज्यांनी पहिला डोस घेतला नाही त्यांनी पहिला,ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा तसेच ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी तिसरा डोस घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच पंधरा ते अठरा वयोगटातील मुला मुलींनाही कोरोना लसीकरणाचा डॉ लसीकरण केंद्रावर जाऊन लवकरात लवकर देण्यात यावा, जागतिक महामारी प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली, लक्षणे आढळून आल्यास त्वरित कोरोना तपासणी करून घ्यावी असेही श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी तमाम मानव जातीला आवाहन कले आहे.

No comments:

Post a Comment