Saturday, January 8, 2022

दीनदयाळ अर्बन बॕकेचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक सदस्य.जुन्या पिढीतील प्रसिध्द डाॕ.दिंगबर दंडे यांचे वृध्दापकाळाने निधन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील जुन्या पिढीतील डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ.दि.ज.दंडे उर्फ दिगंबर जनार्धनराव दंडे यांचे आज शनिवार दि.8 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.परळी शहरातील जुन्या पिढीतील डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ.दि.ज.दंडे यांचे आज शनिवारी निधन झाले. दीनदयाळ अर्बन बँकेचे ते माजी अध्यक्ष व संस्थापक सदस्य होते. परळी शहरात विशेषतः ग्रामीण भागात त्यांनी मोठी रूग्णसेवा केली असून नाडी तपासणी करून रूग्णांवर योग्य दरात उपचार करणे अशी त्यांची पद्धत होती. त्यांच्या निधनाने जुन्या वैद्यकिय सेवेचा दुवा आज निखळला आहे. डॉ.दि.ज.दंडे यांच्या पश्चात डॉ.विवेक व तेजस ही दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.दंडे कुटुंबियांच्या दुःखात दैनिक परळी प्रहार परिवार सहभागी आहे. डॉ.दि.ज.दंडे हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत आणीबाणीतही त्यांनी काम केले होते. परळी शहरातील अनेक सेवाभावी संस्थांसोबत त्यांचा निकटचा संपर्क होता .

No comments:

Post a Comment