परळी वैजनाथ - (प्रतिनिधी) कोरोना परिस्थितीमुळे पुन्हा सर्व शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. कोरोना संकट गंभीर आहे हे लक्षात येत आहे पण या उपाययोजना पायी सर्व शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे किती अतोनात नुकसान होत आहे हे डोळे झाक करता येत नाही.
विद्यार्थ्यांच्या काळजी मुळे मागील दोन वर्षापासुन शाळा बंद, चालु असेच सुरु आहे. थोडक्यात शिक्षणात सातत्य राहिले नाही. आर्थिक नुकसान आज ना उद्या भरून निघेल पण शैक्षणीक नुकसान कसे भरून काढणार ही चिंतेची बाब आहे . कोरोना किती दिवस राहिल हे आता कोणीही सांगु शकत नाही मग कोरोना सोबत जीवन जगण्याची कला सर्वांनाच आत्मसात करावीच लागेल. आताच कुठे नियमीत शाळा सुरू झाल्या होत्या व लगेच बंद झाल्या त्यात दिवाळी, उन्हाळी सुट्टी. शाळा बंद हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान असेल. या मुळे एक पिढी अर्धशिक्षित होऊ शकते.
तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा. हीच तळमळ आहे. विद्यार्थी आज्ञाधारक असतात. त्यांना सांगीतलेले आदेश ते तंतोतंत पाळतात. त्यामुळे कोराना सोबत जगण्याची कला ते लवकर आत्मसात करतील. शाळा सुरु करून प्रथम हेच शिक्षण द्यावे. परंतु शाळा सुरू ठेवाव्यात. शिफ्ट नुसार (पाळी पद्धत) , आठवड्यातून एक दिवसा आड विद्यार्थ्यांना बोलावावे. रोज थोडे तरी विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. दुसरे कारण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे सर्वच विद्यार्थ्यांकडे आधुनिक मोबाईल असतील असे नाही. त्यात इंटरनेट सुविधा नसतात. व या सुविधा असल्या तरी मनात उद्भवणा-या शंका विचारण्या साठी शिक्षकांशी भेट झालीच पाहिजे. त्यासाठी शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत आणि यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.
हे सर्व करताना विद्यार्थ्यांची काळजी घेतलीच पाहिजे.
१) विद्यार्थी वाहतूक सार्वजनिक न वापरता पालकांनी जवाबदारी घेतली पाहिजे.
२) मास्क, सॅनेटायजेर, स्वच्छता, योग्य अंतर या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे.
अपघात होऊच नये म्हणून कोणी वाहन चालवणे सोडीत नाही. तसेच वर्षानुवर्षे राहणाऱ्या कोरोनामुळे शाळाच बंद ठेवावी. हे आता योग्य वाटत नाही.
सर्व गोंष्टीचा सखोल विचार करून शाळा पुन्हा सुरु ठेवाव्यात. सखोल विचार करून शाळा पुन्ह सुरू ठेवाव्यात अशी मागणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, वर्षाताई गायकवाड़ शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक पुणे याच्या कड़े निवेदन द्वारे मागणी केली सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी हिंद नगर परळी वै यांनी केली आहे
No comments:
Post a Comment