जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ मोफत भाजीपाला वाटप; सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

बीड - आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी घेऊन, सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं बाजार भरवत, मोफत भाजीपाला वाटप करत अनोखं आंदोलन केल आहे. दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार भरवण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील अर्थचक्र कोलमडले असुन शेतकरी तसेच छोटे व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत.
आठवडी बाजारात भाजीपाला, धान्य, कपडे, जनावरे आदिंची खरेदी विक्री होत असून लाखो रूपयांची उलाढाल होत असते. मात्र प्रशासनाचा मनमानीपणा सुरू असून राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे., आठवडी बाजारचं बंद का ? असा सवाल आंदोलक सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान प्रशासनाने आठवडी बाजारास परवानगी द्यावी. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा गणेश ढवळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment