Wednesday, January 5, 2022

मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रेत तहसील कार्यालयात आणले.




केज :- केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील एका मागास समाजाच्या वृद्ध महिलेचे निधन झाले होते. तिचा अंत्यविधी करण्यासाठी गावात मागास समाजाला स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी त्या महिलेचे प्रेत केज तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले.

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील वयोवृद्ध महिला लक्ष्मीबाई शहाजी कसबे हिचे दि. ४ जानेवारी  मंगळवार रोजी रात्री १०:०० वा च्या सुमारास निधन झाले. परंतु तिचा अंत्यविधी करण्यासाठी मगासवर्गीय समाजाची स्मशानभूमी उपलब्ध नाही. पूर्वी हे लोक शेजातील माळेगाव येथील सरकारी गायरान जमिनीत अंत्यविधी करीत होते. परंतु त्या गायरान जमिनीत काही वर्षापूर्वी मागासवर्गीय समाजातील भूमिहीन लोकांनी अतिक्रमण करून ते जमीन कसत आहेत. त्यामुळे त्यांना तेथे अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच सोनेसांगवी येथे ग्रामपंचायतीने सोनेसांगवी येथील खुल्या जागेत स्मशाभूमी करण्याचा ठराव घेतलेला आहे. परंतु त्या शेजारील लोकानी विरोध केल्यामुळे संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी दि. ५ जानेवारी  सकाळी १०:०० वा. च्या दरम्यान एका ट्रॅक्टर मध्ये प्रेत घालून ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून ठेवले आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून तहसीलदार दुलाजी मेंडके हे सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, सरपंच विजयकुमार ईखे, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रवींद्र जोगदंड, मुकुंद कणसे यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे व पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवलेला आहे.

No comments:

Post a Comment