Sunday, January 2, 2022

प्रदुषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा.

facebook sharing button

twitter sharing button
मुंबई  :- नववर्षाच्या सुरुवातीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे होणारं प्रदुषण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिकच असतील, असं आदित्य ठाकरे यांनी घोषित केलं आहे.

खरंतर राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासूनच होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्यानिमित्ताने त्यांनी तीनही ज्येष्ठ मंत्र्यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

No comments:

Post a Comment