Monday, January 10, 2022

संसदेनंतर आता सुप्रिम कोर्टात कोरोनाचा कहर, चार न्यायाधिशांसह 150 पॉझिटिव्ह.


 * संसदेनंतर आता सुप्रिम कोर्टात कोरोनाचा कहर, चार न्यायाधिशांसह 150 पॉझिटिव्ह.

  दिल्ली:- देशावरील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. सामान्य नागरिक, नेते, अभिनेते यांनाहीकोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. आता देशातील सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवातसर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून चार न्यायाधिशांसह 150 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह

आढळले आहेत. यासह 150 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण

झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अद्याप 200 अहवाल

प्रलंबित असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 'आज

तक तत्पूर्वी संसदेमध्येही कोरोनाने एन्ट्री केली होती. संसदेतील

400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर

आल्याने खळबळ उडाली होती. यात संसदेतील कर्मचाऱ्यांसह

सुरक्षा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

राज्यात सुसाट

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना सुसाट आहे. गेल्या 24 तासांमध्ये

राज्यात 44 हजार 388 रुग्णांची नोंद झाली असून 15 हजार

351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 12 रुग्णांचा

मृत्यूही झाला. रविवारी आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यातील

कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे.

No comments:

Post a Comment