परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी ही गुणवान रत्नांची खान असुन जिद्द व चिकाटीने परळीतील विद्यार्थी देशपातळीवर यश संपादन करत आहेत.विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले नीट परिक्षेत यश संपादन केलेल्या कु.अवनी घुगे व अमेय देशपांडे यांचा सत्कार डॉ.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
परळी शहरातील डॉ.अनिल घुगे यांची कन्या अवनी घुगे हीने 667 व डॉ.गुरूप्रसाद देशपांडे यांचे चिरंजीव अमेय देशपांडे याने 605 गुण घेऊन नीट परीक्षेत घवघवीत यश मिळविले याबद्दल डॉ.संतोष मुंडे यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की परळी सारख्या ग्रामीण भागातून अथक परिश्रमाच्या बळावर विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत.परळी शहरातही अनेक शैक्षणीक संस्था विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहेत.परळी शहर व परिसरातुन घडत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करु असेही डॉ.संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment