परळी वैजनाथ ;- येथील कांतीकारी साथी,आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था,व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतिने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .भारत सरकारने 2015 पासून सर्व सामान्य लोकांना संविधानाचे महत्व समजण्याच्या हेतूने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याच्या माध्यमातून सर्व भारतीय जनतेस अमूल्य असे अधिकार प्रदान केले असून या दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीत केलेल्या योगदानाची आठवण करण्यासाठी स्मरण करण्यासाठी कांतीकारी साथी, आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था,व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले . व संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक. आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या अध्यक्षा जय महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा मगर महिलाना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सभासद संघटनेच्या सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment