मुंबई - (प्रतिनीधी) राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आहे. यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेनं ४ सदस्यांची भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र २ सदस्यांची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अखेर ३ सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, राज्यात मुंबई वगळता इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग रचना स्वीकारण्यात आली आहे. मुंबईत मात्र एकसदस्यी प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यासोबत नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये २ सदस्यीय प्रभाग रचना तर नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असेल, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
Wednesday, September 29, 2021
सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणी व बंजारा समाजाच्या मागण्या बाबत ना.विजय वडेट्टीवार यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे निवेदन.
राष्ट्रवादीच्या बीड शहर सचिव पदी विशाल वाघमारे यांची निवड.
मतदार यादीत तुमचं नाव नाही का? किंवा नसेल तर. निवडणुक आयोगाची विशेष मोहिम.
भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला.
पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवा
मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृत, दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा.
नमुना क्रमांक ७ भरून संबंधित ठिकाणी जमा करावा
देशपांडे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात. मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक ७ भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.
प्रक्रिया सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद
कुरुंदकर यांनी सांगितले की, आगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे. याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहे; तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.
तोंडात बोळा कोंबून महिलेवर बलात्कार.
नाशिक :- देशाला हादरवून सोडणारी मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे.या घटना ताज्या असताना, नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला.
यानंतर आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे नागरिकांना आवाहन.
बीड :- बीड जिल्हयात होत असलेल्या अतिवृष्टी मुळे विविध ठिकाणी आणि नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. या भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा.
आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकाठी राहणाऱ्या जनतेने सतर्क राहावे आणि पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
Tuesday, September 28, 2021
ना.जयंतरावजी पाटील व धनंजयजी मुंडे साहेब यांचे परळी नगरीत आगमन होताच टाळ मृदंगाच्या जय घोषात स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौकात अभुतपूर्व स्वागत.
गेवराईत भीषण आगीत दुकाने जळून खाक.३० लाख रूपयांचे नुकसान.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. जवळपास 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
गेवराई शहरातील कोल्हेर वेशीच्या आतमध्ये सोनार लाईन आहे. यामध्ये शिवाजी दहिवाळ, टाक यांचे सोन्याचे दुकान आहे, तर मडकर यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे नुकसान झाले. दरम्यान रात्री 2 वाजण्याच्या सुमारास येथील एका दुकानामध्ये अचानक लाग लागली.
पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण करत शेजारच्या दोन दुकाना देखील आगीच्या भक्ष्यस्थानी घेतल्या. आग लागल्याचे लक्षात येताच जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. यामुळे आसपासचे अनेक दुकानाला झळ पोहचली नाही.
दरम्यान या घटनेत दुकानातील सर्व वस्तू, माल जळून खाक झाल्या आहेत. या घटनेतील मडकर यांचे इलेक्ट्रॉनिक दुकानाचे जवळपास 15 लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचे सांगितले जात असून एकूण तीन्ही दुकानाचे मिळून 30 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बीडमध्ये पावसाचा हाहाकार. बिंदुसरा धारण ओव्हरफ्लो, पुलावरून वाहू लागले पाणी.
बीड (प्रतिनीधी) :- डोकेवाडा व अन्य तलाव क्षेत्रात पावसाच्या पाण्याने जोर वाढल्याने बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्णपणे भरले असून बिंदुसरा ओव्हर फ्लो झाले आहे.

त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आला आहे, जुने आणि नवीन बीडचा संपर्क तुटल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवलील नव्या पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे पावसाचा जोर वाढत असताना शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामीण भागासह शहरात देखील या पावसाचा फटका बसला आहे बीड शहरातून बिंदुसरा धरण क्षेत्रामध्ये काल रात्री झालेल्या पावसामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, शहराला जोडणारा जुना पूल आहे आणि यावरून पाणी वाहत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Monday, September 27, 2021
वाशी शहरालगत असलेल्या शेतकर्यांच्या शेतात पडला सोनेरी दगड.

वाशी (प्रतिनीधी)- शहरालगत असलेल्या शेतात शूक्रवार दि.24 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक एक सोनेरी दगड पडल्याने तर्कवितर्क लढवले जात असून घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

वाशी येथील शेतकरी प्रभु माळी हे आपल्या शेतात सकाळी भाजीपाला काढत असताना अचानक सूऽऽसू आवाज करत त्यांच्या अंदाजे सहा फुटावर एक दगड पडला.त्यांनी भांबावलेल्या अवस्थेत इकडे=तिकडे पाहिले .शेतकर्यांने जवळ जाऊन निरीक्षण केले असता,पडलेला दगड सोनेरी रंगाचा असून त्या ठिकाणी खड्डा पडला असल्याचे त्यांनी तहसिलदार नरसिंग जाधव यांना फोनद्वारे कळविले.

तो दगड शेतकर्यांने अव्वल कारकून सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला असून उल्कापात असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले असून त्याचे वजन केले असता 2 किलो 38 ग्रॅम असल्याचेही सचिन पाटील यांनी सांगितले.पुढील तपासणीसाठी भु जल वैज्ञानिक उस्मानाबादला पाठविण्यात आला असून वरिष्ठ वैज्ञानिक बी.एम्.ठाकुर यांनी सांगितले की,हा दगड उल्कापातचा वाटतो,परंतु तपासणीनंतरच अनुमान काढण्यात येईल .घाबरण्याचे काही कारण नसून अवकाशात घडणाऱ्या घडामोडीतून असे उल्कापात पृथ्वीच्या कक्षेत आल्यामुळे असे घडत असते.
Thursday, September 23, 2021
Wednesday, September 22, 2021
महात्मा गांधी जयंतीदिनी एफ एम आकाशवाणी, रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन केंद्र सुरू करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार-चेतन सौंदळे
Tuesday, September 21, 2021
श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन.
Friday, September 17, 2021
सिरसाळा येथे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांची धावती भेट, उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले स्वागत,
स्वराज्य ध्वज यात्रेचे भद्रावती येथे भव्य स्वागत.
Thursday, September 16, 2021
पवनराजे अर्बन निधी बँकेत शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न.
Sunday, September 12, 2021
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी- एस. एम. देशमुख
* अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट.
पुणे ( प्रतिनीधी) पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी आणि पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकारयांमार्फत तपासावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.
एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने आज दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली.. शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील यांचा समावेश होता.
राज्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत..एक सत्य बातमी दिल्यामुळे केज येथील पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे देशमुख यांनी वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.. पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकारयांमार्फत तपासून पहावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने केली..वरील मागण्यांसंदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पत्रकारांचे पेन्शन, आणि अन्य प़श्न प़लंबित आहेत. पत्रकारांना कोरोना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे आणि ज्या १५५ पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे अशा सर्व पत्रकारांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांचे अनुदान द्यावे आदि मागण्या सातत्यानं सरकारकडे केल्या जात आहेत. परंतू या संबंधी कोणताच निर्णय होत नसल्याने आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी अशी विनंती वळसे पाटील यांच्याकडे केली असता, मुख्यमंत्र्यांशी बोलून अशी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली.
पवनराजे अर्बन निधी बँकेत. ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे व अतुल दुबे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती.
मंदिर खुली करण्यासाठी आता नव्या आंदोलनाची घोषणा!
‘मध्य प्रदेश सरकारने दाखल केलेल्या अपिलावर हा निवाडा नुकताच झाला आहे. या निवाड्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो देवस्थानांना होणार आहे. देवस्थानच्या जमिनीवर पुजारी आणि इतर लोक स्वत:च्या नोंदी करून मालकाप्रमाणे वागत आहेत. तर देवस्थानला दिवाबत्ती करण्यासाठी सुद्धा पैसा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या संघटनांतर्फे तातडीने गावांमधील कर्त्या ग्रामस्थांना संघटित करून हे आंदोलन चालवले जाणार आहे. यापुढे पुजारी फक्त नोकर किंवा व्यवस्थापकाच्या स्वरूपात मंदिरात राहू शकणार आहेत. त्यामुळे देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर पुजार्यांची मालकी आणि ताबा यापुढे राहणार नाही. तर देवस्थानची मालकी आणि देवस्थानचा ताबा या जमिनीवर राहणार आहे. भारतीय संविधानाचे कलम १४१ नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा हा संपूर्ण भारतातील देवस्थान जमिनींना लागू होतो,’ असं गवळी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जमिनी या देवस्थान वतन स्वरूपाचे असल्यामुळे त्याला कूळ कायदा लागत नाही. परंतु पुजारी आणि त्यांच्या वारसांनी अशा हजारो एकर जमिनीची विल्हेवाट आतापर्यंत लावली व कोट्यवधी रुपये बेकायदेशीरपणे मिळवले. तर संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे, अशी भूमिकाही गवळी यांनी मांडली आहे.या आंदोलनासाठी ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम यांनी पुढाकार घेतला आहे.
निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस स्थगिती नाही !

नवी दिल्ली – ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे नक्की झाले आहे .
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा विनंतीवजा आदेश गैरलागू असल्याचेही न्यायालयाने सांगितल्याने सरकारची मोठी गोची झाली आहे.
निवडणूक आयोगाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अहवाल देताना राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता निवडणुकीचे वेळापत्रक ठरविण्याचा राज्य सरकारला कोणताही अधिकार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारचा आदेश अडथळा ठरू शकत नाही, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. निवडणूक पुढे ढकलण्यासाठीचा राज्य सरकारचा निर्देश रद्द करतानाच याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सहा आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाला द्यावा, असे खंडपीठाने सांगितले आहे.
ओबीसी आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेल्याने वाशीम, धुळे, अकोला, नंदुरबार, पालघर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच तसेच पंचायत समितीमधील ओबीसी मतदारसंघातील निवडी 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या होत्या. शिवाय या जागांसाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी केली होती. पालघर वगळता इतर जिल्ह्यांत कोरोनाची साथ कमी असल्याने तेथे निवडणूक जाहीर करण्यात आली.87 जिल्हा परिषद गट आणि 119 पंचायत समिती येथे पोटनिवडणुका घेण्यासाठीचे वेळापत्रकही ठरविले.मात्र राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत सदर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.
आता यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे