लातूर :(प्रतिनीधी) उमरग्याहून जात असलेल्या दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ असल्याच्या संशयावरूनलातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले. यात १२ लाख रूपये किमंतीचा ५६ टन तांदुळ पकडण्यात आला असून पुढील चौकशी करून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
लातूर-नांदेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यातील दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ अवैद्य मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हणमंत आरदवाड, ईश्वर स्वामी, हणमंत मस्के व इतर पोलीसांनी या दोन ट्रकची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये तांदुळ आढळून आला. याबाबत चालकास याबाबत विचारणा केली असता हा कर्नाटक राज्यातून तांदुळ गोंदीया येथे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. परंतू ट्रकचे वजन उमरगा चौरस्ता येथे करण्यात आल्याचे दिसून आले. चालक देत असलेली माहिती व कागदपत्र यात तफावत असून तांदुळ स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा केला जाणार असल्याचा संशय आल्यामुळे पोलीसांनी दोन्ही ट्रक ठाण्यात आणले. ट्रकचे चालक बीरागोंडा ईश्वर हुगुंडा (वय ३०) व अहमद अमिर पटेल (वय २५) रा. दोघें वडनखेरा ता. हुमनाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

No comments:
Post a Comment