Monday, June 14, 2021

एसीबीच्या पीआय विरुद्ध लाच मागितल्य प्रकरणी गुन्हा दाखल !


एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !

बीड (कांतीकारी साथी न्युज) लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी दोन लाखाची लाच मागून पन्नास हजार रुपयावर तडजोड करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकावर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राजकुमार पडावी अस त्या अधिकाऱ्याच नाव आहे .

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या एका अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना अटक केली होती .या प्रकरणी मदत करण्यासाठी एसीबी चा पीआय राजकुमार पडावी याने दोन लाखाची मागणी केली होती .तडजोडीत पन्नास हजार देण्याची तयारी करण्यात आली होती .

या प्रकरणी एसीबीच्या महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यावर चौकशी अंती पडावी आणि अन्य एका जणांविरुद्ध बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

No comments:

Post a Comment