Friday, June 11, 2021

दुचाकी,चारचाकी चोरणारी टोळी पकडली ! सात दुचाकी दोन चारचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

 

दुचाकी,चारचाकी चोरणारी टोळी पकडली !

बीड ( कांतीकारी साथी न्युज) जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून दुचाकी अन चारचाकी वाहने चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे .या चोरांकडून तब्बल सात दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत .

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे प्रकार वाढल्याने पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी व त्यांच्या पथकाने फिल्डिंग लावली होती .

माजलगाव तालुक्यातील चाटगाव येथील विष्णू केकान हा मोटारसायकल चोर घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोनि राऊत आणि टीमने त्याच्यासह त्याच्या साथीदाराला जेरबंद केले .तेव्हा त्यांच्या साथीदारांनी माजलगाव, पुणे,हिंगोली येथून दुचाकी अन चारचाकी वाहने चोरून नेल्याचे कबूल केले .यावेळी केकान सह राजेंद्र शेळके आणि शेख कलीम यांना अटक केली .त्यांच्याकडून सात मोटारसायकल आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आले .

No comments:

Post a Comment