Saturday, May 29, 2021

वडवणी येथे रुग्णवाहिकेचे अँड. अजित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण.

वडवणी ( प्रतिनिधी ) कोरोणा काळात रुग्णवाहिकांची कमतरता भासत होती. त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. त्यामुळे शासनाने बीड जिल्ह्यात पंधरा रुग्णवाहिका नव्या घेऊन पाठवल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, वडवणी येथे आलेल्या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्थ अँड. अजित एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
            या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मधुकर घुबडे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष गुंजकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोराळे, श्याम थोटे, वाहन चालक रामदास घुले यांच्यासह सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता.
            या रुग्णवाहिकेचे मुळे रुग्णांना लाभ मिळणार असून जुनी रुग्णवाहिका अत्यंत जुनी झाल्यामुळे ती त्रासदायक ठरत होती. नव्या रुग्णवाहिकेची चावी यावेळी मान्यवरांनी ड्रायव्हर रामदास घुले यांच्याकडे सुपूर्त ही केली.
             यानंतर अँड. अजित देशमुख यांनी व अन्य मान्यवरांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तेथे उपस्थित असलेल्या रुग्णांना बरोबर चर्चा केली. या ठिकाणचे डॉक्टर मोराळे हे याठिकाणी परिपूर्ण सेवा देत असल्याने अँड. अजित देशमुख यांनी त्यांना धन्यवाद देऊन दिले.

No comments:

Post a Comment