* नागरीकांच्या सोयीसाठी परिवहन मंत्र्यांना निवेदन.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी आणि अंबाजोगाई उपविभागासाठी पूर्वी बीड आरटीओ परिक्षेत्र होते. त्यावेळी परळी वैजनाथ येथे आठवड्याला तीन वेळा आरटीओ कॅम्पचे आयोजन केले जात होते. परंतू जेंव्हापासून अंबाजोगाई आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले आहे तेंव्हापासून परळी येथील होणारे आरटीओ कॅम्प बंद करण्यात आले आहेत. हे कॅम्प पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी राज्याचे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना दिले आहे. त्याचबरोबर या निवेदनाच्या प्रति राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरविंद जगताप यांना पाठविण्यात आल्या आहेत.
चंदुलाल बियाणी यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी उपविभागाचा विस्तार मोठा असून, परळी शहरासह यात १०९ गावांचा समावेश आहे. या उपविभागातून मिळणारा महसुलही मोठा आहे. या बाबी लक्षात घेता अंबाजोगाई आरटीओ कार्यालयाने परळी वैजनाथ येथे आठवड्यातून तीन वेळा कॅम्पचे आयोजन केले तर येथे मोठ्या प्रमाणावर नागरीकांची सोय होईल. शिकाऊ ड्रायव्हींग लायसन्स, लायसन्सचे नुतनीकरण, वाहन नोंदणी या कॅम्पच्या माध्यमातून होईल व त्यामुळे जेष्ठ नागरीक, महिला व नागरीकांची होणारी गैरसोय थांबेल. याकरीता वरील मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा व परळी वैजनाथ येथे आठवड्यातील तीन दिवस आरटीओ कॅम्प घ्यावा अशी विनंती राज्याचे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे

No comments:
Post a Comment