बीड (प्रतिनीधी) बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे.काहीही झाले तरी मोर्चा निघणारच असा ठाम निर्धार आ मेटे यांनी व्यक्त केला आहे
याबाबत विनायक मेटे म्हणाले की, 5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोचार्ला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच’
असा निर्णय बैठकीत झाला आहे. या वेळी या मोचार्चे नाव ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे असणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे.
यासाठी 9 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल, असे विनायक मेटे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे तसंच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तो पर्यंत निकराचा लढा सुरूच राहील’ असं देखील विनायक मेटे म्हणाले
No comments:
Post a Comment