Saturday, May 1, 2021

शरद पवारांचे पक्षाला आदेश राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टिच्या वतिने मुख्यमंत्री सहाय्यता नीधीस दिले 2 कोटी !


मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही मदतीचा हाथ पुढे केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री सहाय्यता फंडमध्ये निधी देण्यासाठी पक्षाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडामध्ये दिला आहे.  

लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी दिली आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे, आवाहन जयंत पाटीलांनी केलेय.तसेच, राष्ट्रवादीचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडमध्ये देणार आहेत.  

महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले

No comments:

Post a Comment