Saturday, April 3, 2021

महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पुर्ण गाव अंधारात.



वडवणी (प्रतिनिधी) वडवणी तालुक्यामध्ये उपळी गावातील नागरिक हे महावितरणच्या गलथान कारभारामुळे परेशान झाले असून गेल्या चार ते पांच दिवसापासून थ्री फेस येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आसुन शेतकरी हैराण झाले आहेत . सध्या गेल्या एक वर्ष भरापासून भारतात कोरोना या विषाणु ने आपले थैमान माजवले असतांना लॉक डावन सारखे संकट नागरिकांवर आले . त्यात अनेकशेतकाऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला . शेतकऱ्यावर व सामान्य नागरिकावर आर्थिक संकट आले असताना पुन्हा महावितरणचे थकीत बील न भरणाराचे कनेक्शन तोडण्यात आले . या वर्षीपाऊस चांगला झाल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परंतु पुन्हा अस्मानी संकट या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आले व वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला . त्यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले . आता शेतकऱ्यांना शासनाची काही मदत मिळेल व काही प्रमाणात राहिलेले पीक हे शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात दिलासा देईल ह्या हेतूने शेतकरी राहिलेल्या पिकांना शेतात राबून , कष्ट करून या पीकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा चार ते पाच दिवस या गावात शेतातील लाइट नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . सध्या उन्हाळ्याचे दिवस असून शेतीला पाणी जास्त प्रमाणात लागत आहे . त्यातच महावितरण पूर्ण वेळ लाइट देत नाही ठराविक वेळेनुसार या शेतकऱ्यांना लाइट मिळते . लाइट बिल सक्तीचे केले न भरणाराचे लाइट कनेक्शन कट करण्यात आले त्यामुळे परेशान झालेल्या सर्व शेतक - यांनी लाइट बिल भरले परंतु वारंवार या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून ही लाइटची खराबी काढली नाही . यामुळे पुन्हा शेतकऱ्यावर महावितरणच्या गलथान कारभारामुळे संकट आले आहे .

No comments:

Post a Comment