Friday, April 30, 2021

तज्ज्ञ म्हणतायत कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. आपण संकटाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री- उध्दव ठाकरे


VIDEO: तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित करण्यासाठी ठाकरे सरकारचा प्लॅन काय? वाचा सविस्तर

मुंबईः संपूर्ण जगात लाटांमागून लाटा येत आहेत. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट चौथी लाट झाली, किती लाटा येणार… पण सर्व काही आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहणार आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. आता तज्ज्ञ म्हणतायत, तिसरी लाटसुद्धा येणार आहे. मग आतापासून आपण संकटाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत होते. पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट आपण अनुभवतो आहोत. ब्रिटननं दुसरी लाट अनुभवलेली आहे. तिसरी लाट येणार नाही, असं कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. किंबहुना आता तज्ज्ञ म्हणातयात, तिसरी लाटसुद्धा येणार आहे. मग आतापासून आपण संकटाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केलेली आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

आपण ऑक्सिजन वाढतोय, त्याला 8 ते 15 दिवस लागतील. तिसरी लाट आली तरी त्यांचे गंभीर आणि घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ द्यायचे नाहीत. या निश्चयानं आपलं सरकार आता कंबर कसून मैदानात उतरलेलं आहे. तसंही ते आधीही उतरलेलं होतंच. दुसरी लाट येण्याची अपेक्षा होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. देशात कोणाचीच तशी तयारी नव्हती, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

…तर तिसऱ्या लाटेला थोपवल्याशिवाय राहणार नाही

तिसरी लाट आल्यानंतर निर्बंध लावण्याची आवश्यकता वाटली तरी देखील अर्थचक्र थांबता कामा नये. म्हणूनच गेल्या महिन्यात मी आपल्या राज्यातील प्रमुख उद्योजकांशी बोललेलो आहे. सर्व कामगार संघटनांच्या युनियन लिटर्सबरोबर बोललेलो आहे. त्यांनासुद्धा तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय करायला हवं, किंबहुना याचीसुद्धा मी त्यांना कल्पना दिलेली आहे. आपण सर्व थरावरती, सर्व पातळीवरती प्रयत्न करतोय. मला खात्री आहे, तिसरी लाट आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण थोपवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.

कोविडची तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजन कमी पडणार नाही

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लाँट निर्माण करण्याच्या सूचना दिल्यात. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या किंबहुना पुरवणाऱ्या प्लांटची निर्मिती करा, असं सांगितलेलं आहे. त्यानुसार टेंडर काढलेली आहेत. खरेदी सुरू झालेली आहेत. त्या सगळ्या प्रक्रियेला 10 ते 15 दिवस लागतील. येत्या काही दिवसांत हे सगळे प्लांट सुरू होतील. कोविडची तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजन कमी पडणार नाही. ही तयारी आपण केलेली आहेत. त्याचं फळ त्यावेळेला नक्की मिळेल. रोज पावणे तीन लाख चाचण्या करतोय. आणखी 3 लाखांच्या वरती आपण जाणार आहोत. यात 60 ते 70 आरटीपीसीआर आणि उरलेला रॅपिड अँटिजन टेस्ट आहेत. आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय.

बद्धकोष्ठतेसह विविध 7 समस्यांवर रामबाण औषध आहे.गुळ आणि गरम पाणी, असा करा वापर.


हे आहेत फायदे
1 शरीराचे तापमान संतुलित होते.
2 मेटाबॉलिज्म वाढते.
3 शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
4 पोट साफ होते.
5 पोटाचे सर्व विकार नष्ट होतात.
6 पचनशक्ती मजबूत होते.
7 किडनीच्या आजारात लाभदायक

असे करा सेवन
यासाठी रोज सकाळी एक ग्लास पाणी गरम करा. आता यामध्ये स्वादानुसार गुळ टाकून मिसळून घ्या आणि सेवन करा. यामुळे तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. जर कुणी व्यक्ती पोटाच्या विकारांनी त्रस्त असेल, तर त्यास गुळ आणि गरम पाणी जरूर प्यायला द्या. आयुर्वेदानुसार गुळ आणि गरमपाणी बद्धकोष्ठतेत औषधाप्रमाणे काम करते. हे नैसर्गिक एंजाइमला वाढवते आणि पचनशक्तीला गती देते. सोबत किडनीशी संबंधित कोणत्याही रोगाला दूर करण्यासाठी गुळ मदत करतो.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य.३० एप्रिल २०२१ : असा असेल आपला दिवस .

 

आजचे राशी भविष्य ३० एप्रिल २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. मात्र, घरातील वातावरण चांगले असेल. शुभ रंग - हिरवा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. शुभ रंग - जांभळा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य/ Gemini Horoscope Today: नोकरीत पदोन्नतीमध्ये येणारे अडथळे दूर होतील. लव्ह लाईफमध्ये तणाव येऊ शकतो. आरोग्याच्या काळजी घ्या. शुभ रंग - निळा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. शुभ रंग - पिवळा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी. 
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग - पिवळा. 
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: राजकारणाशी संबंधित व्यक्ती सफल राहतील. लव्ह लाईफ यशस्वी राहील. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद असेल. डोळ्यांचे विकार संभवतात. निळा रंग समृद्धीकारक आहे. शुभ रंग - निळा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. आर्थिक व्यवहाराच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. शुभ रंग - केशरी.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग - नारंगी.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - तपकिरी.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. शुभ रंग - लाल.

Thursday, April 29, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना.


मुंबई, दि. २८ - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड - १९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या नमुद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विधीमंडळ, मा. उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.

ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचन देण्यात आल्या आहेत.

०००

खाजगी रुग्णालयात अग्नीचे महातांडव. 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू.


ठाणे (मुंब्रा) :- रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनां विसर पडला नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला 

पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे.

रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आगीत रुग्णालयाचा पहिला मजला जळला असून, यात तीन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. मृतांच्या वारसांना पाच लाख, तर जखमींना एक लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली

शिधापत्रिका धारकांचा अंगठा न घेता धान्य वितरणास परवानगी द्यावी. यासाठी १ मे पासून स्वस्त धान्य दुकान बंदचा इशारा.

.औरंगाबाद (प्रतिनीधी) शिधापत्रीका धारकाचा अंगठा न घेता माल वितरणास परवानगी द्यावी, अन्यथा दि.१ मे पासून धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. या प्रकरणी आदर्श रेशन दुकानदार वेलफेअर असोसिएशनने वैजापूर तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक स्वस्त धान्य दुकानदार दगावले आहेत. नाशिक जिल्ह्यात तर स्वस्त धान्य दुकानदाराच्या कुटूंबातील पाच जण दगावल्याची घटना आहे. शिधापत्रीका धारकांचे अंगठे इ पास मशीनवर घेतल्यानंतर दूकानदारालाही आपला अंगठा मशीनवर द्यावा लागतो. त्यामुळे दुकानदाराचा अनेक जणांशी संपर्क होतो. अनेकांशी संपर्क आल्याने कोरोना फैलाव व दुकानदाराला ही संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही. यामुळे शिधापत्रिका धारकांचे अंगठे न घेता केवळ दुकानदाराचा अंगठा आधी प्रमाणीत करून माल वाटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार यांनी केली आहे. या बाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे केवळ दुकानदाराच्या अंगठ्यावर माल वाटपाची परवानगी द्यावी, अन्यथा दि.१ मे पासून दुकान बंद ठेवून इ-पास मशीन तहसिल कार्यालयात जमा करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य. २९ एप्रिल २०२१ : असा असेल गुरुवार.


  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अनोळखी व्यक्तींसोबत वाद घालू नका. कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहिल. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. शुभ रंगः पांढरा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. विशेषत: खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंगः लाल.  
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. अधिक खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. शुभ रंगः पिवळा. 
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. रात्रीच्या मध्यान्हानंतर शारीरिक रुपातून मनात प्रसन्नता राहिल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. शुभ रंगः पांढरा
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. शुभ रंगः लाल.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल. घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. शुभ रंगः हिरवा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल. शारीरिक रूपातून मन आनंदीत राहिल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. शुभ रंगः पिवळा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. खर्च वाढेल. मनावर स्थिरता ठेवा. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.  मित्रपरिवारांच्या झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न राहिल. शुभ रंगः हिरवा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मन स्थिर ठेवल्यामुळे, आरोग्य चांगले राहिल. वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंगः पांढरा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नकारात्मक विचार करू नका. वाईट गोष्टींमुळे मन अस्थिर राहिल. कौटुंबिक वातावरणात परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या.  कोणत्याही कामाची सुरूवात करू शकता. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल. शुभ रंगः लाल. 
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहिल. धनप्राप्ती होऊ शकते. जीवनात अपयश येईल आणि अधिक खर्च देखील वाढेल. शुभ रंगः निळा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. मन प्रसन्न ठेवा.काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो. शुभ रंगः जांभळा.

Wednesday, April 28, 2021

१मे पासुन पंधरा दिवस लाॕकडउन पुढील महिन्यात सुद्धा असणार कडक निर्बंध !


मुंबई – एप्रिल महिन्याच्या सुरवातीला लावलेले निर्बंध,माध्यन्हा पर्यंत कडक निर्बंध झाल्यानंतर आता 1 मे पासून पुन्हा पंधरा दिवसासाठी वाढवण्यात आले असून आता सध्या सुरू असलेले कडक निर्बंध 15 मे पर्यंत कायम राहणार आहे असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला .

कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत असले तरी राज्यातले कोरोना संकट अद्याप कायम आहे. राज्यात सहा लाख ७२ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. यामुळे महाराष्ट्रात १५ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. सामान्यांना रेल्वे, बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास मनाई आहे

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई आहे. खासगी वाहतुकीसाठी चालक आणि प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एवढ्या प्रवाशांना परवानगी. रिक्षात चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड होणार आहे. बसमध्ये उभ्याने प्रवासाला मनाई आहे तसेच खासगी बसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेलाच परवानगी आहे. प्रवासात ओळखपत्र बाळगण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

किराणा मालाची विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री, भाजीपाला विक्री, फळेविक्री तसेच अंडी, मटण, मासे चिकन यांची विक्री तसेच कृषी संबंधित उत्पादनांची विक्री आणि सेवा, पशूखाद्य विक्री, सर्व प्रकारच्या इंधनची विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत होणार आहे.

पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहक वाहने यांच्यासाठीची इंधन विक्री नियमित वेळेनुसार होईल. हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डीलिव्हरी रात्री आठपर्यंत सुरू राहील. धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, भाजीपाला तसेच फळे-फुले यांचे बाजार बंद राहतील. द्वार विक्री अथवा वितरणास परवानगी आहे. ऑनलाइन शॉपिंग सुरू राहील आणि होम डीलिव्हरी करता येईल.वाइन शॉप बंद असली तरी दारूच्या होम डीलिव्हरीला परवानगी आहे.

सरकारी, निमसरकारी आणि खासगी शिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लास बंद राहतील. सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. स्टेडियम आणि मैदाने प्रेक्षकांसाठी बंद तसेच व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी चालणे वा धावणे वा इतर व्यायाम बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद राहणार आहेत

कोरोना मुक्तीसाठी ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांचे नवनाथ पारायण.शिवाजी गडेकर यांच्या निवासस्थानी कोरोना नियम पाळून होत आहे कार्यक्रम.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या संसर्गाने अवघ्या विश्वाला जंग जंग पछाडले असून कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर, अनेक रूग्णांना मृत्यूच्या कवेत आणणारी आहे. प्रशासन व वैद्यकिय यंत्रणा आपआपल्या परीने कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरीही देशाचे अध्यात्मीक आणि धार्मीक योगदान सुद्धा आता कोरोना मुक्तीसाठी पुढे आले असून ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांनी श्री नवनाथ पारायणास सुरूवात केली आहे. सलग दहा दिवस हे पारायण चालणार असून ईश्वराकडे कोरोनापासून मुक्ती दे अशी प्रार्थना केली जात आहे.

माणिकनगर येथील रहिवाशी शिवाजी नरसिंगराव गडेकर यांच्या निवासस्थानी कोरोना मुक्तीसाठी दहा दिवसीय श्री नवनाथ पारायणास आज बुधवार पासून प्रारंभ झाला. ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के हे नवनाथ पारायणाचे अत्यंत सुरेखपणे निरूपण करीत असून पहिल्याच दिवशी कथेला प्रारंभ करतांना त्यांनी ईश्वराकडे आम्हा सर्वांना कोरोना संसर्गापासून मुक्ती दे, आपण निर्मित केलेले हे विश्व पाना फुलाप्रमाणे सजीवांच्या माध्यमातून फुलू दे अशी प्रार्थना ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांनी केली. 

वैद्यकिय ज्ञान अत्यंत महत्वाचे असून त्याला अध्यात्माची जोड मिळाली तर चांगलेच होईल असे सांगत कोरोना पासून बचाव करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे सर्वांनीच करावेत. कोरोनाचा आजार परळी शहर आणि तालुक्यात वाढत असल्याने एक प्रामाणिक प्रयत्न कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही करीत आहोत. यश येणे किंवा न येणे हे शेवटी ईश्वराच्या स्वाधीन असल्याचे सांगत आम्ही अध्यात्मीक व्यक्ती असून ईश्वराला साकडे घालण्याशिवाय आणखी काय करू शकतो असेही ते म्हणाले. दरम्यान हा घरगुती कार्यक्रम असला तरी परिसरातील निवडक व्यक्तींना येथे निमंत्रित करण्यात आले आहे. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन येथे केले जात आहे.

धनु्भाऊ तुम्ही फक्त परळीचे नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात.परळी सोडुन जिल्हात लक्ष द्या.- अशोक हिंगे


बीड :-( प्रतिनिधी) 28 बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर माजला असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे  हे फक्त परळी येथे ठाण मांडून बसले असून बाकीचा संपूर्ण बीड जिल्हा वार्यावर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. 
      लाॅकडाऊन झाले तरी बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या कमी होताना दिसत नाही. शासकिय आणि खाजगी रूग्णालयात ही आॅक्सीजन, बेड उपलब्ध नाहीत,व्हेटिलैटर अभावी रुग्णाचे जीव जात आहेत. गेल्या तीन दिवसांत एक हजार च्या आसपास इंजेक्शन ची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस इंजेक्शन उपलब्ध झाले. आज इंजेक्शन अभावी अनेक रूग्णांना जिव गमवावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनान नवीन पाचशे बीडचे अद्यावत रूग्णालय उभारण्याची घोषणा करत पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही. जिल्हा रुग्णालयात ही कर्मचारी संख्या कमी पडत असून साफसफाई स्वच्छता याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन यांच्यात ताळ मेळ नाही.
अशा परिस्थितीत मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री या. धनंजय मुंढे यांनी प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन पहाणी केली असती तर त्यांना ढिसाळ नियोजन दिसुन आले असते. पालकमंत्र्यांनी लक्ष घातले तर रेमडीसिवीर ईंजक्शनचा कोटा वाढवून मिळेल.तेव्हा अजुनही वेळ गेलेली नाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन रेमडीसिवीर इंजेक्शन ,आॅक्सीजन पुरवठा नवीन रुग्णालयाची उभारणी, लस उपलब्धता यात जातीने लक्ष घातल्यास रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल..
अन्यथा यापेक्षाही जास्त परिस्थिती बिघडल्यास त्यास पालकमंत्री आणि जिल्हाप्रशासन जबाबदार असतील असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी म्हटले आहे.

प्लेटलेट्स म्हणजे काय? आणि त्यांची संख्या कमी होणे का आहे नुकसान दायक.जाणून घ्या महत्त्वाची माहीत.


नवी दिल्लीः वृत्तसंस्था: दरवर्षी, पावसाळा संपल्यानंतरही वातावरणात ओलावा कायम राहतो, जो डासासाठी अनुकूल असतो. म्हणून ऑक्टोबर महिन्यात त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागते. यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात.  डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यास शरीरात प्लेटलेट(platelets ) कमी होण्यास सुरवात होते.

प्लेटलेट्स(platelets ) म्हणजे काय
निरोगी व्यक्तीच्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते, जे प्रामुख्याने पातळ पदार्थ, लाल आणि पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेटसह इतर अनेक घटकांनी बनलेले असते. लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेतात. हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. पांढऱ्या रक्त पेशी आपल्याला संक्रमणास सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य देतात. सामान्यत: निरोगी व्यक्तीच्या एका चौरस मिलीलीटर रक्तातील प्लेटलेटची संख्या दीड ते चार लाखांदरम्यान असते. जखम झाल्यावर रक्ताच्या जमावाच्या प्रक्रियेस वेग वाढवून रक्तस्त्राव रोखणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. अशा परिस्थितीत, आपले प्लेटलेट्स कोलेजेन नावाच्या द्रवपदार्थासह एकत्रित होतात आणि दुखापतीच्या ठिकाणी तात्पुरती भिंत बनवतात आणि रक्तवहिन्यास खराब होण्यापासून वाचवते. वास्तविक प्लेटलेट हाडांच्या अस्थिमज्जामध्ये असलेल्या पेशींचे फार छोटे कण असतात. रक्तामध्ये विशिष्ट प्रकारच्या थ्रॉबोपीटिन हार्मोनमुळे हे रक्तामध्ये विभागले गेले आहे.

प्लेटलेटच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान
जेव्हा रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होते, तेव्हा त्या अवस्थेस वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत थ्रोबोसाइटोपेनिया म्हणतात. जर प्लेटलेटची संख्या 10,000 च्या खाली गेली तर रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. हे रक्त नाक किंवा त्वचेच्या बाहेर वाहते. जर हा स्राव आतमध्येच राहिला तर मग मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसांसारख्या शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या अकार्यक्षमतेची शक्यता देखील वाढते. ठराविक प्रकारचे पेनकिलर किंवा अल्कोहोल, अनुवांशिक रोग, केमोथेरपी, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया किंवा चिकनगुनिया झाल्यानंतर प्लेटलेट्स रक्तामध्ये कमी होऊ लागतात. जर त्यांची संख्या 10,000 च्या खाली गेली तर रुग्णाला स्वतंत्रपणे प्लेटलेट्स देण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय.


मुंबई : महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.

*मोफत लसीकरणाबाबत अजित पवारांचे सूतोवाच.

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आर्थिक भाराचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

* कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा अंदाज.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य.२८ एप्रिल २०२१ : जाणून घ्या कसा जाईल दिवस.


आजचे राशी भविष्य २८ एप्रिल २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. कामा-धंद्यात यश मिळेल. घरात कोणत्याही कार्याचा शुभारंभ करू शकता. मोठा आर्थिक लाभ होईल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक क्षेत्रांतील नवनवीन विचार मनात निर्माण होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. काम-धंद्यात यश आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. शुभ रंग - पोपटी
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांत वाढ होईल. व्यवसाय आणि नोकरीत अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नकारात्मक विचारांमुळे मन अस्थिर राहील. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंग - पांढरा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य /  Cancer Horoscope Today: काम-धंद्यासाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होईल, भाग्य उजळेल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. सहकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. शुभ रंग - जांभळा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  मन प्रसन्न राहील. कुटुंबात ताणतणावाचे वातावरण राहील. व्यवहार करतांना इतरांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. सायंकाळ झाल्यानंतर आरोग्यात सुधारणा होईल. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रांत तुमची गोडी राहील. शुभ रंग - आकाशी
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:  कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य निरोगी राहील. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग - जांभळा
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: घरातील सदस्यांमध्ये प्रश्न निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होईल. शुभ रंग - राखाडी.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यापारात वाढ होईल. वायफळ खर्च करणं टाळा. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतांना विचारविनिमय करा. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. इतरांशी आर्थिक व्यवहार करतांना, मतभेद करू नका. मनावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करू शकता. शुभ रंग - लाल.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: उत्तम आहाराचे सेवन केल्यामुळे, आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. पैशांचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. नोकरी आणि कामा-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मनावर संयम ठेवा. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करू शकता. शुभ रंग - नारंगी.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  नकारात्मक विचार मनातून दूर करा. आहारावर विशेष लक्ष द्या. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. साहित्य आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये गोडी निर्माण होईल. शुभ रंग - पिवळा.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. कार्यात यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मन शांत राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कोणतेही कार्य करतांना काळजी घ्या. सरकारी कामात यश मिळेल. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. शुभ रंग - नारंगी

Tuesday, April 27, 2021

पुढील 48 तासात मुसळधार पाऊसाची शक्यता. हावामान खात्याचा सर्तर्कतेचा इशारा .

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रातही उष्णता वाढली आहे. मात्र वाढत्या उष्णतेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात येत्या 48 तासात मध्य, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, अनेक ठिकाणी वादळी वाराही राहण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

वाढलेल्या उष्म्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल झाला असून या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिलाय. मात्र शेतपिकाच्या नुकसानीची धास्ती वाढली आहे. देशात इतर काही राज्यांतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. बळीराजाला या अवकाळी फटका बसू शकतो. यामध्ये उन्हाळी कडधान्य, बाजरी, भूईमुग आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊ शकते. 

दरम्यान, उत्तराखंड, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा, तेलंगणा, केरळ तसेच माहे आणि जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील मैदानी क्षेत्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, दक्षिणेकडील आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वाऱ्यासह वादळ येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य. २७ एप्रिल २०२१ : हनुमान जयंतीला असे असेल तुमचे भविष्य.


  • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल.
  • मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील
  • कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल


आजचे राशी भविष्य २७ एप्रिल २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. भगवान श्री गणेशाची पूजा करा. शुभ रंग - लाल.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कामा-धंद्यात वाढ होईल. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यामुळे, तुमचे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - पोपटी.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. गरीबांना दानधर्म करा. धनलाभ होईल. शुभ रंग - आकाशी.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव लाईफ उत्तम राहील. नोकरीत पदोन्नती होईल. शुभ रंग - नारंगी.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. विवाहीत जीवनात आनंद मिळेल. मन स्थिर राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. शुभ रंग - तांबडा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी दिवस संघर्षमय असेल. तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. शुभ रंग - तपकिरी.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च करणं टाळा. व्यापारात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहिल. शुभ रंग - हिरवा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरातील महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. लव लाईफ चांगली राहील. धन आगमन होईल. आरोग्य निरोगी राहील. कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात अनुकूल वातावरण असेल. शुभ रंग - पांढरा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. व्यापारातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. गृहस्थजीवनात सुख - शांतता राहील. शुभ रंग - निळा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा. 
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. लव लाईफ उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. शुभ रंग - पिवळा.

Monday, April 26, 2021

सा.जगमित्र चे संस्थापक संपादक भास्करराव जोशी यांचे निधन !


संपादक भास्करराव जोशी यांचे निधन !

परळी वैजनाथ - येथील गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा जुन्या पिढीतील निर्भिड जेष्ठ पत्रकार, संपादक भास्करराव जोशी यांचे आज दि.२६ रोजी औरंगाबाद येथे निधन झाले.क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना.धनंजय मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परळी व बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील जुना,जाणता, मार्गदर्शक हरवल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.

भास्करराव जोशी यांच्यावर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते ७५ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात वामन व प्रशांत ही दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत भास्करराव जोशी यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक व न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची वृत्ती , निर्भिड बाणा, रोखठोक पत्रकारिता असा त्यांचा सर्वदुर परिचय होता.अनेक वर्षे त्यांनी परळीत सक्रिय पत्रकारिता केली.जुन्या परळीच्या जडणघडणीत पत्रकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.परळीतील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.ते साप्ताहिक जगमित्रचे संस्थापक संपादक होते. जुन्या गावभागातील एक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून भास्करराव जोशी परिचित होते. त्यांच्या निधनाने परळी व बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील जुना,जाणता, मार्गदर्शक हरवल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.

जुन्या पिढीतील निर्भिड संपादक व मार्गदर्शक हरवला- ना.मुंडे
दरम्यान भास्करराव जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्विय सहाय्यक प्रशांत जोशी व कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला. भास्करराव जोशी (भाऊ) हे आमचे पारिवारिक सदस्य होते. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन राहिले. त्यांच्या निधनाने परळीतील जुन्या पिढीतील निर्भिड संपादक व मार्गदर्शक हरवला असल्याची शोकभावना ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

कोरोना लसीकरण हे युद्धपातळी वर घरोघरी जावून करण्यात यावे सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया ची मागणी.


नवी मुंबई - वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया कडून केंद्रीय अरोग्यमंत्रालाय कडे केल्या गेलेल्या १८ वर्षा वरील सर्व लोकाना कोरोना प्रतिबंधनात्मक लस देण्यात यावी, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद भेटला आहे. आता गरज आहे योग्य नियोजन आणि वेळ न घालवता मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण करण्याची. ते करताना कुठेही गर्दी होवू नये, लस वाया जावू नये. लसीचा पुरवठा नियमित असावा असे बऱ्याच गोष्टी लक्षात घेवून राज्य सरकारला उपाययोजना करव्या लागतील. ट्रस्ट काही पर्याय सुचवले गेलेत ज्यामुळे लसीकरण नियोजत वेळेत व गर्दी टाळून करता येण सहज शक्य होईल. 
तरी आत्ता महाराष्ट्र सरकारने युद्धपातळीवर ही लसीकरण मोहीम राबवावी, त्यासाठी घरोघरी जावून लसीकरण करण्याची मागणी ट्रस्टच्या अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी केली आहे. तसेच ब्रेक द चैन या अंतर्गत हाच पर्याय सर्वसामान्य जनतेसाठी योग्य आणि सोयीचा असल्याचे ठाम मत सरचिटणीस अभिजीत दिलीप सांगळे यांचे आहे. लसीकरण हे मोफतच असाव, त्याचे योग्य नियोजन व यंत्रणा राज्य सरकार ने तातडीने करावे अशी प्रतिक्रिया संस्थापक संजय वासुदेव पवार यांनी दिली.

Sunday, April 25, 2021

१ मे पासुन ८० कोटी जनतेला मोफत धान्य.रेशन दुकाने किंवा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणार .

 

1 मेपासून 80 कोटी जनतेला मोफत धान्याबरोबर आता हे मिळणार नाही

नवी दिल्लीः केंद्र सरकार 1 मेपासून 80 कोटी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) लाभार्थ्यांना मोफत 5 किलो अतिरिक्त अन्नधान्यांचे मासिक वितरण करण्याची तयारी करत आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत गरिबांना मदत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. रेशन दुकाने किंवा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे प्रधानमंत्री गरीब कल्याण कल्याण योजनेंतर्गत (PMGKY) दोन महिन्यांसाठी अतिरिक्त धान्य दिले जाईल.

* कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठीच लॉकडाऊन.

काही राज्य सरकारांच्या विनंतीनुसार PMGKY ची पुन्हा अंमलबजावणी करण्यात येत असल्याने मागील वर्षी या योजनेचा चांगला परिणाम दिसून आला. मागील वर्षी कोविड 19 चा प्रसार थांबविण्यासाठी अचानक लॉकडाऊन केला.

खाद्य सचिव सुधांशु पांडे म्हणाले, एफसीआयने आपल्या 2,000 हून अधिक डेपोची संपूर्ण यंत्रणा तयार केलीय, जेणेकरून राज्यांना वितरण करण्यासाठी हा साठा तयार आहे. एफसीआय राज्यांशी सतत संपर्कात आहे. आम्ही एफसीआयकडून राज्य सरकारला पुरवठा सुनिश्चित करू आणि त्यानंतर वाजवी दरातील दुकाने किंवा रेशन दुकानांवर ते वितरीत करण्याची व्यवस्था करू.

* 80 लाख टन धान्य वाटप केले जाणार.

ते म्हणाले की, येत्या दोन महिन्यांत 80 लाख टन धान्य वाटप करण्यात येणार असून, त्यामुळे सरकारी तिजोरीवर 26,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल.

* PMGKY अंतर्गत डाळींचा समावेश नाही.

पांडे म्हणाले की, यावेळी PMGKY अंतर्गत डाळींचा समावेश करण्यात आलेला नाही. मागील वर्षी हे अपवादात्मक ठेवले गेले होते आणि धान्यांसह डाळी मोफत दिली गेली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) योजना फक्त अन्नधान्याबाबत आहे. सचिव म्हणाले की, जर मोदी सरकारकडे PMGKY योजना जूनपासून वाढविण्यास पुरेसा साठा आहे. मी तुम्हाला खात्री देतो, परिस्थितीशी सामना करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा साठा आहे. खरेदी सुरू असल्याने अधिक स्टॉक येत आहे.

*संपूर्ण लॉकडाऊन नाहीच.

सरकार केवळ दोन महिन्यांसाठी मोफत अन्नधान्याच्या वितरणावर का बंदी घालत आहे आणि येत्या काही महिन्यांत हे टाळेबंदी होण्याची चिन्हे आहेत का? असे विचारले असता सचिव म्हणाले, पंतप्रधान स्पष्टपणे सांगितले की, संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. ते म्हणाले की, वर्ष 2020 मध्ये लादलेला लॉकडाऊन हा कोविड 19 च्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशाला संसाधनांसह तयार करण्यासाठी होता. ते म्हणाले, केवळ (दोन महिन्यांसाठी मोफत धान्य) का? हा सरकारचा निर्णय आहे. सरकार सतत परिस्थितीचा आढावा घेत असते. सरकारने विचार केला की, या वेळी दोन महिने जाहीर केले पाहिजे हे शहाणपणाचे आहे. मला खात्री आहे की, सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवेल.

* 8 महिन्यांत 3 कोटी टन धान्य वितरण.

एप्रिल ते नोव्हेंबर 2020 दरम्यान सरकारने PMGKY अंतर्गत 3 कोटी टन धान्य वितरणावर 1.05 लाख कोटी रुपये खर्च केले.

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा व भोजन. शहरात दोन ठिकाणी व्यवस्था; मोहनलालजी बियाणी अन्नछत्रचा उपक्रम.



परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालय, कोव्हीड सेंटर येथे कोरोना रुग्णांवर मोठ्या संख्येने उपचार केले जात असून सर्वच कोव्हीड सेंटर रुग्णसंख्येने वाढले आहेत. एकीकडे उपचार तर दुसरीकडे रुग्णांचे नातेवाईक निवारा नसल्याने रुग्णालयाच्या परिसरात भर उन्हात, अन्नपाण्याशिवाय ताटकळत बसत असून ही गंभीर अडचण लक्षात घेऊन स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र, राधा मोहन साथी प्रतिष्ठान व आरोग्य मित्रच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नपाणी देण्यासोबत निवाराही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय परिसर व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र, बचपन प्ले स्कुल जवळ हे निवारे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. 
स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र, राधा मोहन साथी प्रतिष्ठान व आरोग्य मित्रच्या वतीने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा माणूसकीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार चालू असून प्रत्येक रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक थांबलेले असतात, त्यांना रुग्णांवर होणार्‍या उपचाराची प्रतिक्षा असते. परंतु कोरोना वॉर्डात कोणत्याच नातेवाईकाला प्रवेश दिला जात नसल्याने शेकडो नातेवाईक रुग्णालय परिसरात थांबलेले दिसतात. हे चित्र शहराच्या शासकीय, खाजगी कोव्हीड सेंटरवर दिसून येते. रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी कोणतीही व्यवस्था तर नाहीच शिवाय लॉकडाऊनमुळे हॉटेल व खानावळी बंद असल्याने त्यांची अडचण होत आहे.
या पार्श्वभूमीवर राधा मोहन साथी प्रतिष्ठान, स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र व आरोग्य मित्रच्या वतीने लवकरच सुरु होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर परिसरात तसेच स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र येथे निवारा माणूसकीचा या अंतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी निवारा उपलब्ध करुन दिला जात आहे. मोठा मंडप येथे टाकण्यात आला असून सोबतच नातेवाईकांना बसण्यासाठी खुर्च्या, गादी व सतरंजी येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एवढेच नाही तर सकाळचा चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवणसुद्धा स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या वतीने नातेवाईकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सर्व व्यवस्था रुग्ण नातेवाईकांच्या करिता मर्यादीत असून येथे पिण्याचे पाणी (शुद्ध) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 
वेळ वाईट आहे, आपण नाहीत...
कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग, रुग्णांवरील उपचारात येणार्‍या वैद्यकीय अडचणी, वाढत चाललेला मृत्यूदर आणि त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे ससेहोलपट या डोळ्यांनी पाहणे शक्यच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू उपचारानंतरच येतील परंतु त्यांना या दोन हाताने काही मदत करता आली तर निश्चितच रुग्णांच्या नातेवाईकांना समाधान मिळेल या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. शहराच्या अनेक भागात रस्त्यावर थांबलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणे हाच या मागचा उद्देश असून वेळ वाईट आहे परंतु आपण कोणीही वाईट नाहीत म्हणूनच मदतीचा हात देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रात पुढचे चार दिवस महत्त्वाचे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.


* 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Alert | पुढचे चार दिवस महत्त्वाचे, महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई : (प्रतिनीधी) एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

*पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे.

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांत पारा चांगलाच तापला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतोय. तसे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

*कोल्हापूरला पावसाने झोडपले.

पुढील चार दिवसांच्या पावसाची चाहूल आज राज्यात काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस पडला. यावेळी जोरदार पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

*ठाण्यात शहापूरमध्ये अवकाळी पाऊस.

आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातसुद्धा काही ठिकाणी पासवाच्या सरी बरसल्या. शहारपूरमधील खर्डी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दरम्यान, आगामी चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच शेतमाल व्यवस्थित ठिकाणी ठेवण्याचेसुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे

महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना - पीयूष गोयल.


* केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाल्याची माहिती दिलीय.

गांधीनगर : महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची संख्या नोंदवले जातेय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच राज्य सरकारकडून शक्य होईल तेथून ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडेही ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याची मागणी केलीय. त्यानंतर आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाल्याची माहिती दिली.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे. ही एक्स्प्रेस ट्रेन महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेला वाढवेल. त्यामुळे कोरोना विरुद्धची लढाई लढण्यास मदत होईल.”

दरम्यान, याआधी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरमध्ये दाखल झाली. विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आली होती. त्यातील 3 टँकर नागपूरमध्ये तर उर्वरित नाशिकला देण्यात आलेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

* मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर केंद्राची मदत.

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे

आधार कार्ड हरवले,आता काय करावे?काळजी करू नका! केवळ 50 रुपयांमध्ये चमकदार PVC कार्ड बनवा.


आजच्या काळात मोठ्या प्रमाणात आधार कार्डे पत्त्याचा पुरावा म्हणून वापरली जातात. यासह मुलांच्या प्रवेशासाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे. Aadhar PVC card

आधार कार्ड हरवले, आता काय करावे? केवळ 50 रुपयांमध्ये चमकदार PVC कार्ड बनवा
Aadhar PVC card

नवी दिल्लीः बँकेत खाते उघडायचे असो की कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा, प्रत्येक कामात आधार कार्ड (Aadhar card) विचारले जाते. आता आधार कार्ड पाहून कोरोनाची लसही दिली जात आहे. आजच्या काळात मोठ्या प्रमाणात आधार कार्डे पत्त्याचा पुरावा म्हणून वापरली जातात. यासह मुलांच्या प्रवेशासाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे.

* काही दिवसातच आपल्याला दुसरे आधार कार्ड मिळू शकेल.

जर आपले महत्त्वाचे कार्ड म्हणजे आपले आधार कार्ड कोणत्याही कारणामुळे हरवले, तर आपण अस्वस्थ होतच असता ना. अस्वस्थ होणे देखील आवश्यक आहे. परंतु काही दिवसातच आपल्याला दुसरे आधार कार्ड मिळू शकेल. हे नवीन पॉलीव्हिनाइल क्लोराईड (पीव्हीसी) कार्ड देखील आहे जे अगदी एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखे दिसते आहे जे आपण सहजपणे आपल्या पाकीटमध्ये ठेवू शकता.

म्हणजेच, जर आपले आधार कार्ड हरवले तर आपण घरी बसून आणखी एक आधार कार्ड (आधार पुनर्मुद्रण) मिळवू शकता. यासाठी आपल्याला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील, ज्यामध्ये स्पीड पोस्टची किंमत देखील जोडली जाईल. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधारचे पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) कार्ड जारी करत आहे. ते आधार कार्ड कसे मिळवायचे ते जाणून घ्या.

‘*माझा आधार विभागातील’ ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.

सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाईट (https://uidai.gov.in) उघडा, त्यानंतर ‘माझा आधार विभागातील’ ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा. ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करताच आपल्याला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडी प्रविष्ट करावा लागेल, या तिन्हीपैकी एक प्रविष्ट करावा लागेल.

* आणि सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा. यानंतर खाली ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर खाली दिलेल्या सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर पीव्हीसी कार्डची प्रत स्क्रीनवर दिसून येईल. ज्यामध्ये आपल्या बेसशी संबंधित तपशील असेल.

* तर विनंती ओटीपीसमोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा.

जर तुमचा मोबाईल नंबर आधार डेटाबेसवर नोंदणीकृत नसेल तर विनंती ओटीपीसमोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, नवीन मोबाईल नंबर दिल्यानंतर ओटीपी पाठवा आणि बटणावर क्लिक करा.

* तुम्ही डिजिटल माध्यमाद्वारे 50 रुपये द्या.

शेवटी पेमेंट पर्याय येईल. त्यावर क्लिक करून, तुम्ही डिजिटल माध्यमाद्वारे 50 रुपये द्या. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्ड मागवा. काही दिवसांनंतर पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या घरी पोहोचेल. ग्लॅमिंग आधार कार्ड जास्तीत जास्त 15 दिवसांत आपल्या घरी पोहोचेल.

* पीव्हीसी आधार कार्डचे वैशिष्ट्य.

UIDAI च्या मते, नवीन पीव्हीसी कार्ड छापण्याची आणि लॅमिनेशनची गुणवत्ता अधिक चांगली आहे. जे दिसण्यात आकर्षक आहे आणि बरेच दिवस टिकेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड पावसात देखील खराब होणार नाही. ते सहजपणे खिशात फिट होईल.

* आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज.

याशिवाय पीव्हीसी आधार कार्ड आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. सुरक्षेसाठी या नवीन दोरखंडात एक होलोग्राम, गिलोचे पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आलीत. नवीन पीव्हीसी आधार कार्डद्वारे कार्डच्या शुद्धतेची पुष्टी त्वरित क्यूआर कोडद्वारे होईल. यामध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत.

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण - ना.नवाब मलिक.

 

Maharashtra Free Corona Vaccination: 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण, नवाब मलिक यांची माहिती
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री

मुंबई: (प्रतिनीधी) महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले. 

केंद्रसरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

* अजित पवार मोफत लसीकरणावर काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय. तसेच महाराष्ट्रातील 18 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले.

* मोफत लस.

1 मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही, आमची क्षमता आहे तेवढी देऊ. इतर कंपन्यांच्या लसी घेण्याबाबत त्यांनी सांगितलं, असंही पवार यांनी नमूद केलं.

* 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी.

अजित पवार म्हणाले, “बल टेंडरमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख असेल. इंजेक्शनचा तुटवडा आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तसं आहे.”

“ऑक्सिजनबाबत जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते सुरु करत आहोत. काही वीजेअभावी बंद होते, काही फायनान्सिअली बंद होते. ते सुरु करत आहोत. पवारसाहेबांनी सूचना केली आहे, साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जामनगरचा जो कोटा आहे तो वाढवला नसला तरी कमी करु नका अशी केंद्राला विनंती केलीय,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

रेमडिसिव्हीर इंजेक्शनसाठी आता जिल्हाला जाण्याची गरज नाही. तालुकास्तरावर मिळणार !


बीड (प्रतिनीधी)  रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी चांगलेच मनावर घेतले असून उद्यापासून तालुक्यातील लोकांना बीडला येऊन नोंदणी करण्याची गरज नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर यादी पाठवतील आणि त्यांना स्टोक मिळून जाईल .

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांची पंधरा दिवसापासून धडपड सुरू आहे .शेकडो लोकांना इंजेक्शन साठी खेटे घालावे लागत आहेत .प्रशासन आणि पुढारी यांच्यात बेबनाव देखील निर्माण झाला .

अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कुचकामी आहेत हे उघडे पडले,या नालायक अधिकाऱ्यामुळे इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याचे समोर आले,त्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांनी ही सगळी जबाबदारी प्रवीण धरमकर यांच्यावर दिली .

धरमकर यांनी याबाबत नुकताच एक आदेश काढला आसून तालुकास्तरावर लोकांनी आता सोमवार पासून बीडला आयटीआय ला येऊन नोंदणी करण्याची गरज राहिलेली नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी,तहसीलदार हे मेलवर ही माहिती बीडला पाठवतील,बीडला इंजेक्शन उपलब्ध झाले की तालुक्याचा कोटा पाठवून दिला जाईल,तो नातेवाईकांना वितरित केला जाईल असे उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी म्हटले आहे .

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य.२५ एप्रिल २०२१ : असा असेल रविवार.


  • आजचे राशी भविष्य २५ एप्रिल २०२१ : कसा असेल रविवार?
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस
  • काय आहे आपले भविष्य.

आजचे राशी भविष्य २५ एप्रिल २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल. स्वतःसाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठी वेळ काढाल. खर्च वाढेल. तब्येत सांभाळावी लागेल. शुभ रंग - पिवळा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नातलगांचे सहकार्य लाभेल. ज्येष्ठांच्या आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. दिवस छान मजेत जाईल. खर्चाचे नियोजन कराल. विनाकारण भटकणे आणि बाहेरचे खाणे टाळणे हिताचे. शुभ रंग - पांढरा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यांचा गंभीरपणे विचार कराल. खर्चाचे नियोजन कराल. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग - हिरवा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरी व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. दिवस मजेत जाईल. स्वतःसाठी आणि जवळच्यांसाठी वेळ काढू शकाल. शुभ रंग - गुलाबी.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. आनंदाची बातमी कळेल. सकारात्मक विचार करणे आणि सकारात्मक वर्तणूक हिताची आहे. खर्च विचारपूर्वक करा. शुभ रंग - आकाशी.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. लोकांकडून अपेक्षा ठेवण्याची सवय सोडा. वाद टाळा आणि कायदा पाळा. पैसे जपून वापरा. शुभ रंग - निळा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: वाहन जपून चालवा. प्रवासात काळजी घ्या. तब्येत सांभाळा. खर्च विचारपूर्वक करा. जोडीदाराच्या सल्ल्यांचा विचार करा. दिवस बरा जाईल. शुभ रंग -  लाल.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वाद टाळा. डोकं शांत ठेवा. जिभेवर साखर ठेवा. कायदा पाळा. पैसे जपून वापरा. शुभ रंग - राखाडी.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. घरात समाधानाचे वातावरण असेल. अनुभवातून आलेल्या शहाणपणाने जगणे हिताचे राहील. शुभ रंग - चंदेरी
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज आराम करा. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. तब्येतीला जपा. बाहेरचे खाणे टाळा. शुभ रंग - जांभळा
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: जिद्दीने प्रयत्न करा यशस्वी व्हाल. खर्चाचे नियोजन करा. तब्येतीला जपा. दगदग टाळा. मोठ्यांचा मान राखा. शुभ रंग - सोनेरी
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: अध्यात्मिक प्रगती होऊ शकते. घरच्यांची उत्तम साथ लाभेल. अडचणीतून मार्ग निघेल. चिंता करणे सोडा. मजेत जगा. शुभ रंग - मोरपिशी 

Saturday, April 24, 2021

पालकमंञी साहेब डाॕ.गित्तेची पाठराखन थांबवा.ऑक्सिजन बंद केला म्हणून दोन जणांचा तडफडून मृत्यू .



बीड ( प्रतिनीधी) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीतेंनी कारभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण व्यवस्थाच अक्षरशःकोलमडून गेली. त्यातच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट त्यांची सत्वपरीक्षा पाहायला आली. दरम्यानच्या काळात माध्यमांनी डॉ. गितेंच्या कारभारावर टीकाटिप्पणी केली पण पालक मंत्री धनंजय मुंडेंनी गीतेंची पाठराखण करत टीका होत असते दुर्लक्ष करायचं असतं असा कानमंत्र दिला. पाठबळ खंबीर असल्याचे लक्षात येताच गीतेच्या बेफिकीर कारभारात आणखी भर पडली. परिणामी आज कोणीतरी अज्ञात इसमाने ऑक्सीजनचा काॅक या प्रकारात दोन रुग्णांचा अक्षरश: कोंबडी तडफडून मरावी असा दुर्दैवी मृत्यू झाला. धनु भाऊ आता तरी जागे व्हा तुमच्या हट्टापायी आणखी किती जणांचे बळी घेणार आहात असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. तुमचं गीतेवर एवढं प्रेम असेल तर त्यांना जागतिक आरोग्य संघटनेत स्थान द्या पण बीडच्या रुग्णांना उड्या मारीत दवाखान्यातून बाहेर येऊ द्या ? प्रेत कूठपर्यंत जाळायची हे जनतेला कळू द्या. तुम्हाला मानसन्मान कमवायला कठोर परिश्रम करावे लागले आहेत पण गिते च्या नादी लागून ती धुळीला मिसळवण्याचा काम होऊ लागला आहे हे धनु भाऊ लक्षात घ्या.

* गिते चौकशी समिती स्थापन करणार !


स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर झटकण्यासाठी व वेळ मारून नेण्यासाठी डॉ. गीते चौकशी समिती स्थापन करणार असल्याचं सांगत आहे. ज्या व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केला त्याला तर अटक कराच पण गीते व राठोड सारख्या ना’लायकांना घरचा रस्ता दाखवा.

* धनु भाऊ गीते साठी जनतेला पणाला लावू नका.

तुमचं नितांत प्रेम गीतेवर आहे हे नितांत सत्य आहे. त्यांच्या प्रेमासाठी जिल्ह्यातील जनतेला पणाला लावू नका. तुमचं प्रेम व गीते चा कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आहे याची धनुभाऊ जाण ठेवा.वणवा पेटला आहे गीतेच्या स्वार्थाची पोळी भाजत आहे. त्याच्या स्वार्थासााठी जनता मात्र होरपळून निघत आहे.

रेमिडीसिवीर चा घोटाळा असो की नुकतीच झालेली कंत्राटी पदभरती असो. ढेपाळलेली आरोग्य सुविधा असो हे सर्व फलित डॉ गीतेच्या कर्तृत्वाच आहे. त्यांच्या कर्तुत्वाला जोड अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची मिळाली आहे. या जोडीच्या जीवावर बीड जिल्ह्याच्या आरोग्याचा गाडा वासराच्या नाकात वार शिरल्यासारखा चौखूर उधळतो आहे. यात जिल्ह्यातील नागरिकांचा जीव अगदी सहज किड्या मुंग्या सारखा जात आहे. धनु भाऊ तुम्ही अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यावर डॉक्टर गीते ना कानमंत्र दिला टीका होत असते लक्ष द्यायचं नसतं हा कानमंत्र लोकांच्या आता जीवावर उठू लागला आहे. तुम्ही गितेंना पाठबळ द्या त्यांच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करा पूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांना नेऊन बसवा आमचं म्हणून काहीच नाही. तो तुमचा विषय आहे. पण डॉक्टर गीते जिल्हा रुग्णालया साठी बुजगावणं ठरत आहे. निष्पाप लोकांचे त्याच्या कारभारामुळे बळी जात आहेत. येणाऱ्या काळामध्ये याचे उत्तर धनु भाऊ तुम्हाला द्यायचे आहे राज्याचे राजकारण असो की जिल्ह्याचे जनता सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे हे विसरू नका. अहो आजचच उदाहरण घ्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल मधील वार्ड क्रमांक सात मधील ऑक्सिजनचा पुरवठा अज्ञात इसमाने बंद केला. दरम्यान ऑक्सिजन बंद होताच दोन रुग्णांचा तडफडून तडफडून मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे अश्रु पुसण्या ऐवजी तुमचा गीते त्यांच्यावर स्वार होऊ लागला. नातेवाइकांनी ऑक्सिजन बंद झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला तर ‘ना‘लायक गीतेने तुम्हीच ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला असा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांवर करत माणुसकीलाच काळीमा फासला. आज संपूर्ण जिल्ह्याने तुमच्या गीते वरच्या प्रेमाने या दोन रुग्णांचा घेतलेला बळी उघड्या डोळ्याने पाहिला. डॉक्टर गीते व सुखदेव राठोड ची जोडी इतकी ताकतवर बनली आहे. डायरेक्ट यांनी यमदेवाला जिल्हा रुग्णालयात रेड कार्पेट अंथरली आहे. काल दुपारपासून तब्बल सोळा रुग्णांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. धनु भाऊ ही वेळ लोकांना मानसिक आधार देण्याची आहे. त्यांचे अश्रु पूसण्याची आहे. कमीत कमी साधन सामग्री चांगले आरोग्य सुविधा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे पालक म्हणून ही जबाबदारी तुम्ही पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहात. पण सूर्यकांत गीते व सुखदेव राठोड सारख्या माणसामुळे येथील जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश शेवटी तुमच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावणारा आहे. यासाठी या दोन्ही अधिकार्‍यांना घरी बसवा. जनतेचे जीव वाचवा अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. धनु भाऊ बूँद से गयी वो हौद से नही आती हे लक्षात घ्या व या दोघांचीही हाकालपट्टी करा अशी मागणी होऊ लागली आहे.

महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळा .


हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये मृतदेह, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

पालघर : (प्रतिनीधी) महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट (PPE Kit) घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. 

महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा, मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

* बारामतीत बनावट रेमडेसिव्हीरमुळे मृत्यू

तिकडे बारामतीत बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत असल्याचं समोर आलं आहे. बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली.

अजून किती माणसं मेल्यावर रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करणार आहेत : राजेश शिंदे


* खासगी डॉक्टरांनी आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्याव
पालकमंत्री,जिल्हाधिकारी साहेब परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.

बीड (प्रतिनिधी)दि.24 कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत आणि अश्या गंभीर परस्थिती मध्ये मात्र या रोगावर शेवटचा पर्याय म्हणून उपयुक्त असणारे रेमडिसिव्हर इंजेक्शन चा तुटवाडा पडलेला आहे या मुळे रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात होळसांड होत आहे. व इंजेक्शन न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत म्हणून अजून किती निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर प्रशासन रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करणार आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान युवा मंचाचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत आणि अश्या गंभीर परस्थिती मध्ये मात्र या रोगावर उपयुक्त असणारे रेमडिसिव्हर इंजेक्शन चा तुटवाडा पडलेला आहे. प्रायव्हेट दवाखान्यामधील रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. रेमडिसिव्हर इंजेक्शन हे शेवटचा पर्याय म्हणून वापरात येणारे इंजेक्शन असून हे इंजेक्शन खासगी डॉक्टर आवश्यक नसताना ही देत आहे या मुळे रुग्णांना भविष्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे आजार होण्याची दाट शक्यता आहे या वरही निर्बंध आले पाहिजेत आवश्यकता असेल तरच गे इंजेक्शन दिले पाहिजे.
मोठ्या प्रमाणात रेमडिसिव्हर इंजेक्शन चा काळा बाजार सुरू असून 800 ते 1400 रुपये किमतीचे हे इंजेक्शन आज 20000 ते 30000 हजार रुपयांना विकल जात आहे. हा सामान्य लोकांना लुटण्याचा सर्रास धंदा सुरू आहे अश्या ब्लॅक ने इंजेक्शन विकणाऱ्या खासगी मेडिकल दवाखाण्यावर प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. 
बीड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असताना इंजेक्शन चा तुटवडा पडत आहे. अश्या परिस्थिती मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन उपलब्ध कुठून करावं हा प्रश्न पडत आहे आणि या मुळे त्यांची मोठ्या प्रमाणात होळसांड होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
वेळेत इंजेक्शन न भेटल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत अश्या गंभीर परिस्थिती मध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेबांनी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून मुबलक प्रमाणात रेमडिसिव्हर इंजेक्शन चा साठा उपलब्ध करून मागेल त्याला इंजेक्शन देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे...

राज्याचे मा.गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयकडुन गुन्हा दाखल.


मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10 ठिकाणी छापे

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 दिवस फक्त चौकशी

कोर्टाने सीबीआयला 100 कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

देशमुखांपुढील पर्याय काय?

दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे असून ते कोर्टात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य.२४ एप्रिल २०२१ : असा असेल शनिवार.


  • आजचे राशी भविष्य २४ एप्रिल २०२१ : कसा असेल शनिवार?
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य.

आजचे राशी भविष्य २४ एप्रिल २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मनात अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. भगवान श्री गणेशाची आराधना करा. वायफळ खर्च करणं टाळा. शुभ रंग - पांढरा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. काम-धंद्यात वाढ होईल. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. धनलाभ होईल. व्यापारात वाढ होईल. कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. शुभ रंग - हिरवा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरी आणि व्यापारातील व्यक्तींना सहकार्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. कामात यश येईल. गृहस्थजीवनात अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग - निळा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाला गती मिळेल. भाऊ-बहिणींसोबत संपूर्ण दिवस आनंदात जाईल. प्रवास सुखाचा होईल. नोकरीत पदोन्नती होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग - नारंगी.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे आरोग्य निरोगी राहील. नकारात्मक विचार मनातून दूर करा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन स्थिर राहील. श्री गणेशाची पूजा-अर्चना केल्यामुळे, मन प्रसन्न राहील. शुभ रंग - लाल.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल. प्रेमळ व्यक्तींच्या भेटीमुळे, मन आनंदीत राहील. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत तुमची प्रतिष्ठा वाढेल. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. प्रवास सुखाचा होईल. उत्तम आहारामुळे, आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - आकाशी.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: घरात शांतीचे वातावरण राहील. तुमच्या कार्यात यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ रंग - हिरवा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. प्रवास करतांना काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं आहे. शुभ रंग - पांढरा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मन अस्थिर राहील. त्यामुळे मनात चिंता सतावत राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होईल. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - राखाडी.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात वाढ होईल. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग - पांढरा. 
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. कठीण परिश्रम केल्यास कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याची चांगले असेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि परिपूर्ण असेल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. मित्र-मैत्रीणींची चांगली साथ मिळेल. मन प्रफुल्लित राहील. प्रवास करताना काळजी घ्या. शुभ रंग - तांबडा.