Saturday, April 17, 2021

कोरोनातील मोफत धान्यात लाचखोरी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी 5 हजार लाच घेताना एसीबीच्या ताब्यात.आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.



* ५ हजाराच्या लाच प्रकरणात तहसीलदार विजय लोखंडेंना अटक.

अकोला (प्रतिनीधी)  : रेशन दुकानातून कोरोना काळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या 55 हजाराचा निधीचा धनादेश देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांना अटक झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कोरोना काळात शासनाने गोरगरिब नागरिकांना रेशन दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप केले होते. त्या याटपाच्या रक्कमेचा धनादेश काढून देण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांची मागणी पुरवठा निरीक्षक निलेश भास्कर कळसकार यांनी केली होती. तक्रारीअंती निलेश कळसकार विरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तपासादरम्यान घेण्यात आलेल्या जबाबावरून तसेच प्राप्त व जप्त केलेल्या दस्तऐवजानुसार तहसीलदार विजय लोखंडे यांनी सार्वजनिक कर्तव्य अनुचितपणे व अप्रामाणिकपणे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


No comments:

Post a Comment