Saturday, April 10, 2021

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात.



cbi cracks down corrupt income tax officials mumbai arrested while accepting rs 15 lakh

मुंबई : (कांतीकारी साथी न्युज)-मुंबईतील Income Tax विभागातील 2 निरीक्षकांना 15 लाखांची लाच स्वीकारतांना CBI च्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत होते.

CBI ने Income Tax विभागातील 3 निरीक्षकांच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी बलार्ड पियर येथील Income Tax विभागात काम करतात. आयकर विभागामार्फत केलेल्या चौकशीत तक्रारदारास मदत करण्यासाठी या तिघांनी 15 लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ठरल्याप्रमाणे हे तिन्ही अधिकारी लाचेची रक्कम स्वीकारण्याच्या तयारीत होते. त्यावेळी CBI च्या पथकाने सापळा रचून 10 लाखांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. तसेच 5 लाख रोख तक्रारदाराकडून जप्त केले आहेत. CBI च्या कारवाई दरम्यान एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, CBI च्या अधिका-यांनी त्यालाही पकडले.

No comments:

Post a Comment