Saturday, April 10, 2021

1.25 लाखाची लाच घेताना तहसीलदार आणि महसूल सहाय्यक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात.


तहसील कार्यालयातील तहसील आणि महसूल सहायक या दोघांनी १ लाख २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. यावरून तक्रारदाराने (शेतकरी) थेट तक्रार औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानंतर त्याठिकाणी सव्वा लाखापैकी सत्तर हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार अविनाश शिंगटे आणि महसूल सहायक अशोक मरकड यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment