Sunday, April 4, 2021

भारतीय पोस्ट खात्यात आता 1 एप्रिलपासून बदलला पैसे काढण्याचा आणि जमा करण्याचा नियम.


post office new rule from 1 april 2021 charges on money deposit and withdrawal

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट खात्याने काही दिवसांपूर्वीच पोस्ट पेंमेन्ट बँक सुरु केली. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँकेनेही ऑनलाइन सेवा सुरु केली. त्यानंतर आता १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस post office मधील बचत खात्याशी संबंधित काही नियमात बदल झाला आहे. पोस्ट बँकेने आता पैसे काढणे, जमा करणे आणि आधार आधारित पेमेंट सिस्टमवर ( एइपीएस) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात पैसे जमा करणे आणि भरण्यासाठी देखील आता शुल्क द्यावे लागेल. जाणून घेऊ बदलेलेला नियम.

साधारण बचत खात्यावर किती द्यावे लागणार शुल्क?
जर साधारण बचत खाते असेल तर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र पैसे काढताना शुल्क आकारले जाणार आहे. इतर बँकांप्रमाणेच हे शुल्क असणार आहे. पहिले चार ट्रॅन्जेक्शन मोफत असून त्यापुढील प्रत्येक ट्रॅन्जेक्शनसाठी २५ रुपये किंवा ०.५ टक्के शुल्क द्यावे लागेल.

बचत आणि चालू खात्यावर किती द्यावे लागेल शुल्क?
जर बचत आणि चालू खात्यातील पैसे काढण्यावरहि आता शुल्क द्यावे लागणार आहे. महिन्याला केवळ २५ हजार रुपयेच काढू शकतो. यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी २५ रुपये शुल्क द्यावे लागेल. तर १० हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी कमीतकमी २५ रुपये शुल्क द्यावे लागेल.

इंडिया पोस्ट एइपीएस खात्यावर लागणारे शुल्क
नॉन आयपीपीबी नेटवर्कमध्ये येणाऱ्यांसाठी सुरुवातीचे तीन ट्रॅन्जेक्शन मोफत असून त्यापुढील व्यवहारासाठी २० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. हा नियम मिनी स्टेटमेंट, पैसे काढणे आणि जमा करणे यासाठी आहे. तर दुसरीकडे आयपीपीबी नेटवर्कमध्ये येणाऱ्यांसाठी अमर्यादित ट्रान्झॅक्शन आहे.
दरम्यान, मिनी स्टेटमेंट हवे असेल तर त्याला आता ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

मर्यादा संपल्यानंतर देखील आपण आर्थिक व्यवहार केले तर खात्यातून व्यवहाराच्या रकमेच्या 1 टक्के रक्कम कापली जाईल. ही रक्कम कमीत कमी 1 रुपया ते जास्तीत जास्त 25 रुपये असेल. विशेष म्हणजे या शुल्कावर जीएसटी आणि सेस देखील लावण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment