Monday, March 22, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य २२ मार्च २०२१: पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात.

आजचे राशी भविष्य २२ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily Horoscope 22 March 2021 rashifal in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहील. शारीरिक रूपातून मन आनंदीत राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. न्यायालयीन कामात सावधगिरी बाळगावी लागेल. आज खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. आजचा शुभ रंगः पिवळा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. खर्च वाढण्याची शक्यता आहे. मनावर ताबा ठेवा. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांच्या झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आजचा शुभ रंगः हिरवा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आज चांगला दिवस आहे. मन स्थिर ठेवल्यामुळे, आरोग्य चांगले राहील. अनैतिक गोष्टी शक्यतो टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. आजचा शुभ रंगः पांढरा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नकारात्मक विचार करू नका. वाईट गोष्टींमुळे मन अस्थिर राहील. कौटुंबिक वातावरणात परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या. आज कोणत्याही कामाची सुरूवात करू नका. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल. आजचा शुभ रंगः लाल. 
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. धनप्राप्ती होऊ शकते. जीवनात अपयश येईल आणि अधिक खर्च देखील वाढेल. आजचा शुभ रंगः निळा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. आज मन प्रसन्न ठेवा. काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो, पण अशा चर्चेपासून शक्यतो दूर रहा. आजचा शुभ रंगः जांभळा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: अनोळखी व्यक्तींसोबत वाद घालू नका. कोणत्याही कामाचा प्रारंभ आज करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहिल. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंगः पांढरा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. विशेषत: खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आजचा शुभ रंगः लाल.  
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आज मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन आनंदी असेल. अधिक खर्च वाढेल. सरकारी कामात अडथळे येतील. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंगः पिवळा. 
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. रात्रीच्या मध्यान्हानंतर शारीरिक रुपातून मनात प्रसन्नता राहिल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंगः पांढरा
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहिल. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंगः लाल.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल. घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. मन शांत ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. आजचा शुभ रंगः हिरवा.

No comments:

Post a Comment