मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार Sharad Pawar यांच्यात सोमवारी (दि. 15) वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यावेळी सचिन वाझे प्रकरण तसेच सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदला संदर्भात महत्वाची चर्चा झाली. गेल्या वर्षभरापासून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही जेष्ठ नेत्यांमध्ये आहे. शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. देशमुख हे शरद पवार Sharad Pawar यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता असून या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचे समजते
No comments:
Post a Comment