Friday, March 5, 2021

परळीकरांसाठी धोक्याची घंटा ! परळीत आज सापडले 14 कोरोना पॉझिटिव्ह.


परळी वैजनाथ ;- परळी शहरात अनेकजण कोरोनाच्या नियमाचे पालन करत नसून जागोजागी गर्दी व विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आज परळीत 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती बीड जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून अशीच परिस्थिती राहिली तर परळी तालुक्यात काही दिवस संचारबंदी लागण्याची शकते.

तसेच परळी शहरात भरणारा आठवडी बाजार आणि मोंढा मार्केट परिसरात असलेले व्यापारी व खरेदी करणारे ग्राहक हे गर्दीत नियम पाळत नसून विना मास्क फिरत आहेत यांच्यावर प्रशासन कुठलीही कारवाई करताना दिसत नसल्यामुळे परळी शहरात रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

एकीकडे महाराष्ट्र सरकार कोरोना संदर्भात गांभीर्य पूर्ण निर्णय घेत असून वेळोवेळी अनेक ठिकाणी अनेक नियमात बदल करीत आहे असे असताना परळीत मात्र या नियमाचे पायमल्ली होत असून प्रशासन कुठल्याही प्रकारे नियमांची अंमलबजावणी करत नसून येथे खुलेआम वीना मास्क तथा गर्दीचे दिसत असल्याने अनेक जण बाजारात विना मास्क फिरत असून यामुळे परळीकर कोरना संदर्भातील नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. परळी प्रशासनाला अनेक कामातून वेळ मिळेल का? हा याकडे लक्ष देतील का ?

No comments:

Post a Comment