नागपूर / पुणे (प्रतिनीधी ) गेल्या आठवड्याभरापासून पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतीय. पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय. शहरात सुमारे महिनाभराच्या खंडानंतर काल पुन्हा एकदा एकाच दिवसांत तीनशेहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. शिवाय मागील आठवडाभरापासून दररोज सातत्याने नव्या रुग्णांत वाढ होतेय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या अहवालातून स्पष्ट होतंय. पुणे शहरात काल (शनिवारी) दिवसभरात 331 तर जिल्ह्यात मिळून 612 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. पुणे शहरात याआधी 20 जानेवारीला एकाच दिवसात 310 नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर तब्बल 25 दिवस शहरातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने 250 पेक्षाही कमी असे.
नागपुरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं
नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट झालेला पाहायला मिळतोय. गेल्या पाच दिवसांत 1717 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली पाहायला मिळतीय. ही वाढ गेल्या 2 महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी होत असताना नागपुरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कायम असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 486 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे.

No comments:
Post a Comment