Monday, February 1, 2021

बनावट दस्ताऐवज तयार करून महसूल विभागाने १०० एकर जमीन हस्तांतर केली.


* दोषींविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.


बीड (प्रतिनीधी )- आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शंभर एकर जमीन बनावट दस्ताऐवज तयार करून हस्तांतरीत करण्यात आली. याला महसूल विभाग कारणीभूत असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
सर्वे नं. ७५, ७६, ७७, ८१, ८१/१ येथील शंभर एकर जमीन खोटे दस्ताऐवज तयार करून हस्तांतरीत करण्यात आली. सदरील ही जमीन देवस्थानाची आहे. या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यां-विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये गणेश ढवळे, शेख युनुस, शेख अनिस, शेख दस्तगीर, शेख गुलाम, शेख रशीद मोहम्मद, शेख चांद, शेख हजरत, शेख नियाज यांच्यासह आदींची उपस्थिती असून या उपोषणामध्ये महिलांनीही हजेरी लावली आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह बीडचे पालकमंत्र्यांसह अल्पसंख्याक विभागाला देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment