Tuesday, February 9, 2021

विद्यमान आमदार विश्वास घातकी,व्यक्तिद्वेषाने पछाडलेले - डाॕ.भारतभूषन क्षीरसागर


whatsapp sharing button

बीड – (प्रतिनीधी)  मतदारांनी टाकलेल्या विश्वासाचा घात करण्याचे काम बीडचे आमदार करीत असून ते करीत असलेल्या तक्रारी या व्यक्तिद्वेषातून असल्याचा आरोप बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केला,नगराध्यक्ष यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्या मध्ये गेल्या काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे .काकांच्या ताब्यात नगरपालिका आहे तर पुतण्या आमदार आहे,त्यामुळे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहतात .

आ संदिप क्षीरसागर गटाचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत आदेश दिले .त्यावर बोलताना फो क्षीरसागर यांनी स्थानिक आमदार यांच्यावर कडक टिका केली .

यापूर्वी अनेक आमदार झाले,विरोधी गटाच्या आमदारांनी देखील नगर पालिका किंवा विकास कामाबाबत कधी आडकाठी आणली नाही,मात्र विद्यमान आमदार केवळ तक्रारी करत आहेत .हा सगळा प्रकार व्यक्तिद्वेषातून होत आहे .

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे मात्र जाणीवपूर्वक शिवसेनेची नगर पालिका असल्याने आमदार आणि पालकमंत्री हे त्रास देत आहेत .याबाबत आपण मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी दिला आहे .

No comments:

Post a Comment