Thursday, January 7, 2021

नामस्मरण व संत संगती हाच मोक्षाचा मार्ग-ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)नामस्मरण व संत संगती हाच मोक्षाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांनी केले. गेल्या सात दिवसापासून माणिकनगर भागातील महिला मंडळाच्या वतिने आयोजित श्रीमद भागवत कथेची आज उत्साहपूर्ण व भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली.
भागवत कथा श्रवणाने मानवी जीवाची भवरूपी संसारातून मुक्ती मिळते यासाठी प्रत्येकाने श्रीमद भागवत कथा, रामकथा व हरीपाठाचे श्रवण व चिंतन नियमित केले पाहिजे असे विचार ह.भ.प.उत्तम महाराज होळंबे यांनी केले.
येथील माणिकनगर भागातील श्री महारूद्र हनुमान मंदिरात भागवताचार्य ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांची श्रीमद भागवत कथा सुरू होती. त्याची समाप्ती मंगळवार दि.5 जानेवारी रोजी भक्तीपूर्ण वातावरणात झाली. कथा सांगते निमित्त होळंबे महाराजांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.यावेळी बोलतांना प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के म्हणाले की, नामस्मरण व संत संगती हाच मोक्षाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. होळंबे महाराज म्हणाले की भागवत कथेत 18 पुराणे 6 शास्त्राचे सार सापडते. अतिशय पवित्र असे हे शास्त्र असून मानवी जीवाने ही कथा श्रवण केली तर त्याची भवरूपी संसारातून व जन्म मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते. सात दिवस ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वाणीतून भागवत कथेतील अनेक मुद्दे कथन केले. व्यासपिठावर ह.भ.प.शेषेराव महाराज वरवटकर, ह.भ.प.संजीवनीताई ढोपरे यांची उपस्थिती होती. यावेळी भाविकांची लक्षणिय उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment